‘बिग बॉस १७’मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे व पती विकी जैन यांना या शोमध्ये एकत्र आल्याचे पाहून चाहत्यांना खूपच आनंद झाला होता. मात्र, या शोमध्ये आल्यापासून या जोडप्यामध्ये प्रेमापेक्षा अधिक भांडणंच पाहायला मिळाली आहेत. पहिल्या दिवसापासून अंकिता व विक्की यांच्यात काहीना काही कारणावरून वाद आणि भांडणं सुरु आहेत. अशातच गेल्या आठवड्या पासून त्यांच्यातील वाद हे आणखीनच विकोपाला गेले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचे वैवाहिक जीवन हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. अशातच नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये, अंकिताने पुन्हा एकदा विक्कीबरोबर भांडण केले आणि त्याच्याविषयी सहानुभूती नसल्याचा आरोप केला. यावर आता झरीन खान आणि किश्वर मर्चंटनी यावर भाष्य केले आहे.
बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानने तिच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर एक खास पोस्ट शेअर करत अंकिता व विकी यांच्याबद्दल वाईट वाटत असल्याचे म्हटले आहे. यात तिने असे म्हटले आहे की, “मी अंकिता आणि विकीला वैयक्तिकरित्या ओळखत नाही. पण ‘बिग बॉस १७’ या शोमध्ये त्यांच्यात इतका संघर्ष होताना पाहून मला खूप वाईट वाटत आहे. या शोपूर्वी ते सोशल मीडियावर लोकप्रिय जोडी म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे माझी इच्छा आहे की त्यांना एकमेकांबद्दलचे प्रेम, त्यांच्या नात्याचे काही खास क्षण त्यांना या शोमध्ये पुन्हा आठवावेत.”
I don’t know Ankita & Vicky personally Bt I just feel so sad to see them having so much conflict on #BB17. They used to be #CoupleGoals on social media before #BB17, I wish they remember the love they share, tht part about their relationship, rather than the show consuming them.
— Zareen Khan (@zareen_khan) January 16, 2024
आणखी वाचा – “एक महिनाही माझं लग्न टिकणार नाही असं…”, सुकन्या मोनेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “संजय गाऊन घालून…”
तर दुसरीकडे, किश्वर मर्चंटने ट्विट केले आहे की ती अंकिता-विकी यांच्या भांडणांना कंटाळली आहे. तिने पोस्ट करत असे म्हटले आहे की, “अंकिता व विकी एकमेकांना इतकं बोलूनही नंतर हे दोघे पुन्हा एकत्र हसतातही आणि पुन्हा भांडणही करतात. त्यामुळे आता बस्स झालं. आम्ही आता वैतागलो आहोत.”
Bored of their fights .. ek dusre Ko itna sab bolne ke Baad , they laugh for a minute and again start fighting again ????
— Kishwer M Rai (@KishwerM) January 16, 2024
Fuck Man just shut up both of You ????????
— Kishwer M Rai (@KishwerM) January 16, 2024
दरम्यान, अंकिता-विकी यांच्यातील भांडणांना काही प्रेक्षकांसह काही कलाकारदेखील वैतागले आहेत. याउलट काहींना या दोघांच्या नात्याविषयी चिंताही व्यक्त केली आहे. यापूर्वी रश्मी देसाई, राखी सावंत, कंगना रानौतसह अभिनेत्री सनी लिओनीने सोशल मीडियावर अंकिता लोखंडेला पाठिंबा दिला होता.