शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाच्या ५०व्या वर्षी पदवीधर झाली ट्विंकल खन्ना, अक्षय कुमार बायकोचं यश पाहून भारावला, म्हणाला, “मी थोडा अभ्यास केला असता तर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 17, 2024 | 11:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay Kumar On Wife

वयाच्या ५०व्या वर्षी पदवीधर झाली ट्विंकल खन्ना, अक्षय कुमार बायकोचं यश पाहून भारावला, म्हणाला, "मी थोडा अभ्यास केला असता तर..."

अक्षय कुमारची पत्नी व अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने लग्नानंतर सिनेसृष्टीतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. ट्विंकल खन्नाने अभिनय सोडून काही वर्ष लेखिका म्हणून काम केलं. तिने आतापर्यंत चार पुस्तके लिहिली आहेत. याचदरम्यान अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी सोडलेले शिक्षणही पूर्ण केले. अलीकडेच, अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने तिचा मुलगा आरवसह विद्यापीठात प्रवेश अर्ज भरला होता. अभिनेत्रीने तिचे केवळ शिक्षण पूर्ण न करता पदवी देखील मिळवली आहे, याची माहिती अभिनेता अक्षय कुमारने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत दिली. (Akshay Kumar On Wife)

अक्षय कुमारने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन बायकोच्या पदवीप्राप्त झाल्यानंतरचा एक फोटो शेअर करत तिचं अभिनंदन केलं. अभिनेत्रीने कोरोनानंतर पुन्हा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि लंडन विद्यापीठात फिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला. आता ट्विंकलचा या क्षेत्रातील अभ्यास पूर्ण झाला असून तिला पदवीही मिळाली आहे. फोटो शेअर करत अक्षय कुमारने लिहिले आहे की, “दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला सांगितले होते की, तुला पुन्हा अभ्यास करायचा आहे. ते ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला”.

आणखी वाचा – “नेरळवरुन ती मला भेटायला आली अन्…”, प्रथमेश परबने पहिल्यांदाच सांगितली त्याची संपूर्ण लव्हस्टोरी,म्हणाला, “मॅसेज केला तरीही…”

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयने पुढे लिहिलं आहे की, “तू जेव्हा मला सांगितलं त्या दिवसांनंतर मी तुला मेहनत करताना पाहिलं. घर, करिअर, मला स्वत:ला व माझ्या मुलांना तसेच तुझं विद्यार्थी जीवन सांभाळत तू घेतलेली मेहनत मी पाहिली आहे. मला माहित आहे की, मी एका सुपर वुमनशी लग्न केले आहे. आज तुझ्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी, मी अजून थोडा अभ्यास केला असता तर टीना, मला तुझा किती अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी माझ्याकडे अजून शब्द असते. अभिनंदन. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत त्याने बायकोच कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “आम्ही आता वैतागलो आहोत…”, अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यातील भांडणं बॉलिवूडलाही पटेना, अभिनेत्री म्हणाली “वाईट वाटतं की…”

अक्षय कुमारच्या या पोस्टवर चाहत्यांसह, कलाकार मंडळींनी कमेंट करत ट्विंकलच अभिनंदन केलं आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले आहे की, “एक पुरुष आपल्या आवडत्या महिलेसाठी इतकं भरभरून लिहितो हे कौतुकास्पद आहे”. तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की, “असा नवरा प्रत्येकाला मिळायला हवा” अशा अनेक कमेंट करत अक्षयच्या बायकोला असणाऱ्या पाठिंब्याचंही अनेकांनी कौतुक केलं आहे.

Tags: akshay kumarakshay kumar wifeentertainmenttwinkle khannatwinkle khanna education
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Marathi actor prathamesh parab praised his wife said he is proud of her see the kelavn special interview

प्रथमेश परबची होणारी बायको करत असलेलं काम पाहून तुम्हीही कराल तोंडभरुन कौतुक, उच्चशिक्षित आहे अन्…; म्हणाली, "गरीब मुलांसाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.