गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गंभीर दुखापत, आईला वाटलं मृत्यू झाला अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “डोक्याला सूज असतानाही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 18, 2024 | 5:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tanishaa mukerji accident

गंभीर दुखापत, आईला वाटलं मृत्यू झाला अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "डोक्याला सूज असतानाही…"

‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री तनिषा मुखर्जी ही सतत चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेत्री काजोलची ही लहान बहीण आहे. अभिनयाचा वारसा असला तरीही आतापर्यंत तिला हवे तसे यश मिळू शकले नाही. २००३ साली तिने आपल्या करियरची सुरुवात केली. या चिटपटाचे चित्रकरण करत असताना तिच्याबाबतील एक भयंकर प्रसंग घडला होता. ज्याबद्दल तिने दिलखुलासपणे सांगितले आहे. हा प्रसंग सांगताना तिला खूप वाईट अनुभव आल्याचेही सांगितले होते. (tanishaa mukerji accident)

तनिषाने २००३ साली ‘Sssshhh…’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. यावेळी तिच्याबाबत एक प्रसंग घडला. ज्याबद्दल ती व्यक्त झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली होती. यामध्ये तिने पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाल्याचे सांगितले. हा अपघात इतका भयानक होता की गंभीर दुखापत होऊन ती बेशुद्ध झाली.पहिल्या चित्रपटाच्या वेळी तनिषाचा अपघात झाला होता आणि त्यावेळी जखमी होऊन ती कोमामध्ये गेली होती. तिची अवस्था बघून आई तनुजा यांना वाटले की मृत्यू झाला आहे.   

आणखी वाचा – संजनाचा अरुंधतीविरुद्धचा डाव यशस्वी, मनूने आई म्हणण्यास दिला स्पष्ट नकार, मालिकेत पुढे काय घडणार?

View this post on Instagram

A post shared by Tanishaa Mukerji (@tanishaamukerji)

याबद्दल तिने सांगितले की, “पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण करताना माझा अपघात झाला होता. गंभीर दुखापत होऊन मी बेशुद्ध झाले होते. माझा मृत्यू झाला असे माझ्या आईलाही वाटले. त्यावेळच्या काही गोष्टी मी विसरले आहे. त्यावेळी मी पुढे काम करु शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करावे असे चित्रपटाच्या दिग्दर्शकांचे म्हणणे होते. तसेच जर तनिषाला काम करणे जमणार नसेल तर तिला या चित्रपटामध्ये काम करता येणार नाही असेही दिग्दर्शक म्हणाले. त्यामुळे डोक्याला सूज असतानादेखील मी हा चित्रपट पूर्ण केला होता”.

आणखी वाचा – “तुझं अफेअर सुरु आहे का?”, जुई गडकरीला चाहत्याने विचारला थेट प्रश्न, अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं सत्य, म्हणाली, “माझं अफेअर…”

या चित्रपटानंतर तिने ‘नील अँड निक्की’, ‘सरकार’, ‘टँगो चार्ली’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती ‘बिग बॉस’ च्या सातव्या सीझनमध्ये दिसून आली होती. या शोमध्ये अरमान कोहलीबरोबर तिच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण त्यांचे नाते अधिक काळ टिकू शकले नाही. तिच्या कामावडदळ बोलायचे झाले तर २०२१ साली ती ‘कोड नेम अब्दुल’ या चित्रपटात दिसून आली होती.   

Tags: bollywood actresshindi movieTanishaa Mukerji
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Shilpa Shetty Raj Kundra advocate statement

"गरज पडल्यास आम्ही अधिकाऱ्यांना…", ईडीने मालमत्ता जप्त केल्यानंतर शिल्पा शेट्टी व राज कुंद्राच्या वकिलाचं भाष्य, म्हणाले, "न्यायव्यवस्थेवर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.