‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. एकामागोमाग एक मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत सायलीच्या भूमिकेवर चाहते खूप खुश आहेत. मालिकेत सायली हे पात्र अतिशय साधं, सरळ आणि निरागस दाखविण्यात आलं आहे. सायली ही भूमिका मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसत आहे. जुईने आजवर अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. खऱ्या आयुष्यातही जुई तितकीच निरागस आहे. (Jui Gadkari On Her Affair)
सोशल मीडियावरही जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. विशेषतः ‘आस्क मी एनिथिंग’ यांसारखे सेशन घेत चाहत्यांशी संवाद साधत असते. अशातच जुईने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘आस्क मी question’ हा सेशन घेतला. यावेळी जुईला एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं तिने भन्नाट उत्तर दिलं.

जुईला तिच्या एका चाहत्याने “तुम्ही सिंगल आहात का?, तुमचं afiar सुरु आहे का?”, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत, जुई म्हणाली, “माझं afiar सुरु नाही आहे”, जुईने हे उत्तर अगदी फनी वेमध्ये दिलं आहे. जुईच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. याआधीही अभिनेत्रीला अनेकदा तिच्या लग्नावरुन विचारण्यात आलं आहे. आणि बरेचदा नेटकऱ्यांच्या या प्रश्नाला ती वेळोवेळी उत्तर देताना दिसते.
अभिनेत्रीने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दलची उत्सुकता व्यक्त केली होती. यावेळी जुईला तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबद्दल विचारले असता जुईने उत्तर देत असे म्हटले की. “लहानपणापासून मला लग्न करायची हौस होती. पण आता खूपच उशीर होत आहे. मी लग्नाचा खूप आधीपासून विचार केला आहे. पण सगळं काही त्याच्या (देवाच्या) हातात आहे. योग जुळून आले की सगळं काही होणार”. आता जुई केव्हा लग्नबंधनात अडकणार?, याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.