शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गरज पडल्यास आम्ही अधिकाऱ्यांना…”, ईडीने मालमत्ता जप्त केल्यानंतर शिल्पा शेट्टी व राज कुंद्राच्या वकिलाचं भाष्य, म्हणाले, “न्यायव्यवस्थेवर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 18, 2024 | 7:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shilpa Shetty Raj Kundra advocate statement

"गरज पडल्यास आम्ही अधिकाऱ्यांना...", ईडीने मालमत्ता जप्त केल्यानंतर शिल्पा शेट्टी व राज कुंद्राच्या वकिलाचं भाष्य, म्हणाले, "न्यायव्यवस्थेवर..."

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती सध्या अधिक चर्चेत आले आहेत. राज कुंद्रा पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. गुरुवारी विरोधात इडीने त्याची तब्बल ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्याच्यावर ही कारवाई तब्बल ६६०० कोटी रुपयांच्या बीटकॉईन प्रकरणाअंतर्गत करण्यात आली आहे. सध्या त्याच्या विरोधात मनी लॉड्रिंग प्रकरणातही चौकशी करण्यात येत आहे. आता याबाबत त्याचा वकील प्रशांत पाटील यांनी खुलासा केला आहे. त्यांनी राज कुंद्राची चौकशी व्हावी असा त्याचा काहीही संबंध नाही. प्रशांत पाटील नक्की काय म्हणाले हे जाणून घेऊया. (Shilpa Shetty Raj Kundra advocate statement)

राजची संपत्ती जप्त केल्याबद्दल इडीने माहिती दिली. त्यानंतर राजच्या विरोधात कारवाई करण्यात आली. मात्र त्यांच्यावर केलेली कारवाई ही चुकीची असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले. याबद्दल राजच्या वकिलांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’बरोबर बोलताना सांगितले की, “आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आदेशाचे पालन करत आहोत. माझ्या अशिलाचे स्वातंत्र्य व संपत्तीच्या रक्षणासाठी मनी लॉंड्रिंग कायद्याअंतर्गत योग्य पावले आम्ही उचलू. मात्र आधी माझे अशिल राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होऊ शकत नाही”.

आणखी वाचा – गंभीर दुखापत, आईला वाटलं मृत्यू झाला अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “डोक्याला सूज असतानाही…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पुढे ते म्हणाले की, “आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही जेव्हा इडीसमोर जेव्हा आमचे म्हणणे मांडू तेव्हा तपास करणाऱ्या यंत्रणादेखील आम्हाला न्याय देतील. आमचा निष्पक्षपातीपणे केलेल्या तपासणीवर पूर्ण विश्वास आहे. गरज पडल्यास आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करु”.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दुःखाचा डोंगर, व्हेंटिलेटरवर असलेल्या बहिणीचं निधन, दीड वर्षापूर्वी भावालाही गमावलं

दरम्याने इडीने केलेल्या ट्विटनुसार राज कुंद्राच्या जप्त केलेल्या संपत्तीमध्ये अंदाजे ९७.७९ कोटी रुपयांची स्थावर, जंगम मालमत्ता कुंद्रा दाम्पत्याची आहे आणि ही कारवाई मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायद्यान्वये करण्यात आली आहे. ही कारवाई PMLA, २०२२ अंतर्गत करण्यात आली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेल्या मुंबईतील जुहू भागातील निवासी सदनिका, तसेच पुण्यातील बंगला आणि कुंद्राच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.पुढे या प्रकरणाला कोणते वळण लागणार हे पाहण्यासारखे आहे.

Tags: casemoney laundringraj kundrashilpa shetty
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
19 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

कुणाच्या राशीत नोकरीचा योग, तर कुणाला मिळणार व्यवसायात यश, उद्याचा दिवस कुणासाठी कसा असणार?, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.