बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर स्वरा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. तिच्या अनेक भूमिकांना चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. तसेच तिच्या काही भूमिका वादग्रस्तदेखील ठरल्या आहेत. अशातच आता ती पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणामुळे अधिक चर्चेत आली आहे. गेल्या आठवड्यात तिचा मौलाना सज्जाद नोमानीबरोबरचा फोटो व्हायरल झाला होता. यावेळी अनेकांनी स्वरावर टीका केली आहे. संबंधित मौलवीने महिलांच्या अधिकारासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे स्वराला ट्रोल केले गेले. तसेच काहीनी स्वराच्या लूकवरुनही ट्रोल केले. याबद्दल तिने ‘एक्स’वर फोटों शेअर करत करत पोस्ट लिहून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. (swara bhaskar new post)
स्वरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली दिसून येते. अनेक प्रकरणांवर ती आपले मतदेखील मांडत असते. अशातच आता तिने केलेल्या एका प्रकरणावरुन ती अधिक चर्चेत आली आहे. रविवारी उत्तर प्रदेशमधील संभल येथे एका पोलिस व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली. या हिंसेदामयान गोळीबार व दगडफेकही झाली. यामध्ये चार लोकांचा मृत्यू व 20 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. यावरुन स्वरा आता व्यक्त झाली असून तिने राग व्यक्त केला आहे.
We are at that point in India where law enforcement is murdering citizens because they are Muslims. And the judiciary ?? They are probably seeking advise from God about how to do their job. Absolute shitshow. #Sambhal
— Swara Bhasker (@ReallySwara) November 26, 2024
स्वराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, आपण अशा देशात आहोत जेथे कायदा लागू करणाराचे नागरिकांची हत्या करत आहेत कारण ते मुसलमान आहेत. आणि न्यायसंस्था? ते कदाचित कसं काम करावं? याबद्दल देवाकडून सल्ले घेत असतील. खूप वाईट”. दरम्यान स्वराची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान स्वरा २०२३ साली फहादबरोबर नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकली होती. सोशल मीडियाद्वारे तिने लग्नाची घोषणा करुन सगळ्यांनाच धक्का दिला होता. दोघांनाही आता एक मुलगी आहे. मुलीचे नाव त्यांनी राबीया असे ठेवले. लग्नानंतर स्वरा अभिनयापासून दूर असलेली बघायला मिळत आहे. मुसलमान मुलाबरोबर लग्न केल्याने स्वराला खूप टीकेचाही सामना करावा लागला होता.