सध्या बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री मलायका अरोरा ही जोडी अधिक चर्चेत राहिली आहे. गेले सहा वर्ष अर्जुन व मलायका हे दोघंही एकमेकांना डेट करत होते. दोघंही लग्नबंधनात अडकतील अशा चर्चादेखील मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वी दोघांचाही ब्रेकअप झाल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अर्जुनने सर्वांच्या समोर सिंगल असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. आता अर्जुनबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आता यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. (arjun kapoor on ex-girlfriend)
अर्जुनने नुकतीच ‘मॅशबेल इंडिया’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला विचारले की, “कधी गर्लफ्रेंडला रात्री ३ वाजता मेसेज केला आहे का?” त्यावर अर्जुनने उलट प्रश्न केला की, “हा प्रश्न मला नीट समजावून सांगाल का?”, त्यावर त्याला पुन्हा विचारण्यात आले की, “कधी तुम्ही तुमच्या एक्स गर्लफ्रेंडला उशिरा रात्री मेसेज केला आहे का?”, त्यानंतर अर्जुनने उत्तर दिले की, “हो मी असं केलं आहे”.
पुढे तो म्हणाला की, “इथे कोण आहे जो खोटं बोलतो की कधीही उशिरा रात्री मेसेज केला नाही असं?, दरम्यान आता अर्जुनच्या या वक्तव्यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केले होते. मुंबई येथील शिवाजी पार्कमध्ये आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये तो म्हणाला होता की, “मी आता सिंगल आहे, रिलॅक्स”. तसेच मलायकाच्याच्या वडिलांच्या निधनानंतर अर्जुन मलायका व तिच्या कुटुंबाला धीर देताना दिसला होता.
अर्जुन व मलायकाने २०१८ साली एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. २०१९ साली त्यांनी सोशल मीडियावर त्यांचं नातंदेखील स्वीकारलं होतं. दोघं अनेकदा पार्टीमध्ये, डिनरला, आऊटिंगदरम्यान दिसून यायचे. मात्र गेल्या काही काळापासून त्यांनी एकमेकांना भेटणं, एकमेकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणं हे सगळं बंद केलं.