बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचं नाव सध्या आवर्जून घेतलं जात आहे. २३ जून २०२४ रोजी दोघही लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघंही वेगवेगळ्या देशांमध्ये फिरताना दिसत आहेत. लग्नानंतर दोघंही युरोप टुरवर असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांचे इजिप्त येथील फोटोदेखील दिसून आले. परदेशदौऱ्यादरम्यानचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. झहीर व सोनाक्षी यांचे प्रॅंकदेखील दिसून आले. अशातच आता त्यांच्या नवीन व्हिडीओने लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये ते ऑस्ट्रेलियामध्ये असलेले दिसून येत आहेत. पण तिथे असताना त्यांच्याबरोबर नक्की काय घडलं? हे आता आपण जाणून घेऊया. (sonakshi sinha viral video)
सोनाक्षी व झहीर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. ते आता ऑस्ट्रेलियातील कॅनबेरामध्ये आहेत. तेथील त्यांचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी रुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी ते एका ग्लास हाऊसमध्ये दिसून येत आहेत. दोघंही बेडवर असून त्यांच्या समोर चक्क सिंह उभा आहे.
ज्या खोलीमध्ये सोनाक्षी व झहीर दिसत आहेत. तसेच खिडकीच्या बाहेर उभा राहून तो डरकाळ्या फोडतानाही दिसत आहे. हा प्रसंग सोनाक्षीने फोनमध्ये कॅप्चर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सोनाक्षीने लिहिले की, “आमचा आजचा गजर”. तेव्हा घड्याळात सकाळचे सहा वाजले होते. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी काही फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. यामध्ये दोघांनी स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेताना दिसत आहेत. तसेच क्वीन्स आयलँडवरत्यांनी ख्रिसमस साजरा केला. तसेच यावेळी त्यांनी बायकिंग व पॅडल बोर्डिंगदेखील केले आहे. त्यानंतर त्यांनी बंजी जम्पिंगचादेखील आनंद घेतला.
दरम्यान, सोनाक्षी आणि झहीरने दोघांनी एकमेकांना ७ वर्षे डेट केल्यानंतर यावर्षी २३ जून रोजी मुंबईत लग्न केले. झहीर आणि सोनाक्षीने एकत्र काम केले आहे. दोघे ‘डबल एक्सएल’मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटात हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत होती. दोघे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात . सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात आणि चाहतेही या दोघांच्या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद देतात.