मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हेमल इंगळेच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. हेमलने ऑगस्ट महिन्यात इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. कतंच तिचं केळवण पार पडलं. कोल्हापुरात अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. याचे खास फोटो हेमलने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “केळवणाला दणक्यात सुरुवात…” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्यानंतर आता तिच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. (hemal ingle pre wedding rituals started)
अभिनेत्री हेमल इंगळेचा नुकताच मुहूर्तमेढ सोहळा संपन्न झाला आहे आणि याची खास झलक तिच्या बहिणीने शेअर केली आहे. या सोहळ्यासाठी हेमलने खास लूक केला असल्याचे पाहायला मिळाले. गडद निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने, मुंडावळ्या आणि हातात हिरवा चुडा या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. हेमलने या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाल्याचा व्हिडीओ शेअर करताना एक खास पोस्टदेखील लिहिली आहे.
या पोस्टमध्ये हेमलने असं म्हटलं आहे की, “गणपती बाप्पाची प्रार्थना करुन एका नव्या प्रवासाची आज मी सुरुवात करत आहे. खरंतर, हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी खूपच भावनिक क्षण आहे. कारण, मुली सासरी जाताना इतक्या भावुक का होतात याचं गांभीर्य मला आधी कधीच जाणवलं नव्हतं. पण, आता मला समजत आहे की, स्त्रियांचं आयुष्य सोपं नसतं. आपलं घर, आजवरचं आयुष्य सगळं सोडून एका नव्या प्रवासाला सुरुवात करणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी एक नवं कुटुंब माझी आतुरतेने वाट पाहतं आहे आणि त्यासाठीही मी नक्कीच उत्सुक आहे”.
आणखी वाचा – मल्याळम अभिनेते दिलीप शंकर यांचा संशयास्पद मृत्यू, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, दरम्यान, हेमलने आता या खास सोहळ्याचे क्षण शेअर केल्यानंतर चाहत्यांना अभिनेत्री लग्नबंधनात कधी अडकणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेत्रीने अद्याप तिच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे अनेक जण तिच्या लग्नाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. हेमलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच ‘नवरा माझा नवसाचा २’या चित्रपटात पाहायला मिळाली होती