दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे ती म्हणजे मल्याळम चित्रपट आणि टीव्ही अभिनेता दिलीप शंकर यांचे निधन झाले आहे. २९ डिसेंबर रोजी सकाळी ते त्यांच्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. या बातमीने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली आहे. हॉटेलच्या खोलीतून दिलीप शंकर यांचा मृतदेह सापडला असून आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दिलीप शंकर यांनी आत्महत्या केली की त्यांचा हा या मृत्यू नैसर्गिक आहे? याबद्दल आता तापस सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल अद्याप काही ठोस माहिती समजू शकलेली नाही. (Dilip Shankar passed away)
काही वृत्तांनुसार, दिलीप शंकर यांचा मृतदेह तिरुअनंतपुरममधील हॉटेलच्या खोलीतून सापडला आहे. ते ‘पाचगणी’ या टीव्ही शोचे शूटिंग करत होते आणि या शूटिंगसाठी ते गेल्या काही दिवसांपासून त्याच हॉटेलमध्ये थांबले होते. खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर दिलीप यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दिलीप शंकर गेल्या काही दिवसांपासून हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडले नव्हते. त्यांना बाहेर येताना कोणीही पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांचा हा मृत्यू संशयास्पद आहे.
घटनास्थळी पोलिसांनाही सुसाईड नोट किंवा इतर काहीही ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे दिलीप शंकर यांचा मृत्यू नेमका कसा झाला? हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे पोलिस आता संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि दिलीप शंकर यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेत आहेत. दिलीप शंकर यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
दरम्यान, दिलीप शंकर यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी अनेक प्रादेशिक भाषेतील चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. ‘अम्मरियाते’ या टीव्ही शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली होती. ‘पाचगणी’मध्ये साकारलेल्या चंद्रसेनन या व्यक्तिरेखेचीही त्याला खूप प्रशंसा झाली. ‘नॉर्थ 24 कथम’ आणि चप्पा कुरीशु सारख्या मल्याळम चित्रपटांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली.