शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सहा महिन्यांतच घटस्फोट, नंतर नवऱ्याने आत्महत्या केली अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं आयुष्य झालं होतं उद्ध्वस्त, अजूनही अविवाहितच राहिली आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 2, 2024 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress rekha husband suicide

सहा महिन्यांतच घटस्फोट, नंतर नवऱ्याने आत्महत्या केली अन्...; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं आयुष्य झालं होतं उद्ध्वस्त, अजूनही अविवाहितच राहिली आणि...

बॉलिवूड हे खूप अस्थिर आहे. तिथे अनेक गोष्टी घडतात व बिघडतात देखील. यामध्ये अनेक नायक-नायिकांच्या अफेअरच्या चर्चाही ऐकायला मिळतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी प्रेमविवाह केला पण तरीही जास्त काळ त्यांचे लग्न टिकू शकले नाही. यातील एक नाव म्हणजे गेल्या चार दशकापासून बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री रेखा. रेखा यांनी मोठ्या व्यावसायिकाबरोबर लग्न केले पण काही महिन्यातच दोघांमध्ये घटस्फोट झाला. ( actress rekha husband suicide )

७०च्या दशकामध्ये रेखाचे नाव दिग्गज अभिनेत्रींमध्ये घेतले जात असे. पण अमिताभ बच्चन यांच्याबरोबर असलेल्या अफेअरच्या चर्चांमुळे त्या अधिक चर्चेत आल्या. अमिताभ यांनी अभिनेत्री जया भादुरी म्हणजे जया बच्चन यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. तरीही एका लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम केल्याने रेखा यांच्याबद्दल खूप चर्चा झाल्या. नंतर त्यांनी कोणत्याही अभिनेत्याशी लग्न न करता दिल्लीमधील एका मोठ्या व्यवसायिकाबरोबर लग्न केले. पण त्यांचा हा संसार अधिक काळ टिकू शकला नाही.

आणखी वाचा – Video : गेट वे ऑफ इंडियाला बोट बूक केली, समुद्रात सेलिब्रेशन अन्…; अमृता खानविलकरने नवऱ्याला दिलं सरप्राइज, रोमँटिक व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Rekha (@legendaryrekha)

मिळालेल्या माहितीनुसार, रेखा यांनी १९९० साली दिल्लीतील मोठे व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याबरोबर जुहूमधील मुक्तेश्वर देवालय मंदिरात लग्न केले. पण लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच पतीबद्दल अनेक गोष्टी त्यांना समजू लागल्या. त्यामुळे सहा महिन्यातच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – “अविनाशच चांगला डान्स करतात आणि…”, ऐश्वर्या नारकरांनी या वयातही रिल बनवण्यामागचं सांगितलं कारण, म्हणाल्या, “नवरा-बायकोचं नातं…”

लग्नानंतर काही बाबतीत दोघांमध्ये एकमत होत नव्हते. त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत वाद होत असत. या वादांना कंटाळून रेखा यांनी  वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे जेव्हा मुकेश यांना समजले तेव्हा त्यांना सहन झाले नाही आणि त्यांनी रेखाच्याच ओढणीने गळफास लाऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये मुकेश यांनी लिहिले होते की, “माझ्या मुलांचा सांभाळ मानसोपचारतज्ञांनी करावा. तसेच मी रेखासाठी काहीही सोडून जात नाही आहे. ती स्वतः कमाऊ शकते”. यावर रेखा यांच्यावर पुस्तक लिहिणारे यासिर उस्मान यांच्या मते सुसाइड नोटमध्ये रेखा यांचा त्यांच्या संपत्तीमध्ये रेखा यांचा हिस्सा नव्हता.

मुकेश यांच्या आत्महत्येनंतर दिल्लीतील माजी पोलिस कमिश्नर नीरज अग्रवाल यांनी सांगितले की,”रेखाने आपल्या पतीच्या संपत्तीमधील काहीही मागितले नाही. तसेच रेखाने पैशासाठी मुकेश यांच्याबरोबर लग्न केले आहे अशा चर्चा देखील झाल्या पण मुकेश यांच्या भावानेच असे नसल्याचे स्पष्ट केले.   

Tags: propertyrekharekha husbandsuicidesuicide noteunsuccessful marriage
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kartiki Gaikwad's father has been awarded Shri Sant Eknath Maharaj Swar Martand Award

कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा संगीतक्षेत्रातील मानाच्या पुरस्काराने सन्मान, लेकीचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, "श्री संत एकनाथ महाराजांचा आशीर्वाद..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.