शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : गेट वे ऑफ इंडियाला बोट बूक केली, समुद्रात सेलिब्रेशन अन्…; अमृता खानविलकरने नवऱ्याला दिलं सरप्राइज, रोमँटिक व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 2, 2024 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Khanvilkar On Husband

Video : गेट वे ऑफ इंडियाला बोट बूक केली, समुद्रात सेलिब्रेशन अन्…; अमृता खानविलकरने नवऱ्याला दिलं सरप्राइज, रोमँटिक व्हिडीओ समोर

मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत अमृता खानविलकरच नाव आवर्जून घेतलं जातं. अमृताने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अमृताच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्याची आजही प्रेक्षकांमध्ये भुरळ असलेली पाहायला मिळते. केवळ मराठीच मर्यादित न राहता अमृताने बॉलीवूडमध्ये देखील आपला दबदबा निर्माण केला. त्यामुळेच तिचा चाहता वर्ग बऱ्यापैकी मोठा आहे. सोशल मीडियावरही अमृता नेहमीच सक्रिय असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Amruta Khanvilkar On Husband)

अशातच अमृताने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमृताने ही खास पोस्ट तिच्या नवऱ्यासाठी केली असल्याचं पाहायला मिळतेय. अमृताच्या नवऱ्याचा म्हणजेच हिमांशू मल्होत्राचा आज वाढदिवस आहे. नवऱ्याचा वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने ही खास पोस्ट करत त्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर तिने नवऱ्याचा वाढदिवस क्रूझवर केक कट करत साजरा केला. नवऱ्याबरोबर वेळ घालवल्याचा आणि रोमँटिक पोज देतानाचा हा सुंदर व्हिडीओ अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.

आणखी वाचा – कोण होणार शाहरुख खानची सून?, ‘त्या’ व्यक्तीला डेट करत आहे आर्यन खान, खान कुटुंबियांना पसंत आहे का मुलगी?

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

या खास व्हिडीओखाली कॅप्शन देत तिने हिमांशूला शुभेच्छाही दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा, तू तुझ्या दयाळूपणाने, सहानुभूतीने आणि प्रेमाने अनेक जीवनांना स्पर्श केला आहेस आणि हे मी अनुभवले आहे. माझ्याकडे तुला शुभेच्छा देण्याशिवाय काहीही नाही. आपली शांतता आपल्या शब्दांपेक्षा जास्त बोलते. तू माझा एक भाग आहेस आणि आता नेहमीच राहशील. या जगात तुझ्याशिवाय काहीही असू शकत नाही”, असं तिने म्हटलं आहे. अमृताच्या या पोस्टवर तिच्या नवऱ्याने कमेंट करत तिने दिलेल्या या गोड सरप्राइजसाठी आभार मानले. कमेंट करत हिमांशू म्हणाला, “या सुंदर सरप्राइजसाठी खूप खूप धन्यवाद अमू. हे सरप्राइज खरंच खूप आवडलं. मलाही तेच वाटतं की, तू नेहमीच माझा एक भाग होतीस, आहेस आणि राहशील”.

आणखी वाचा – प्रथमेश लघाटेने पुन्हा सुरु केला व्यवसाय, पोस्ट शेअर करताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव अन्…; म्हणाला, “अव्वल दर्जा…”

आपल्या अभिनयाने व नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमृताने हिंदी टेलिव्हिजन अभिनेता हिमांशू मल्होत्राबरोबर २०१५ मध्ये लग्न केले. इतकी वर्षे ते दोघेही सुखाने संसार करत आहेत, पण दोघेही एकत्र राहत नाही. अमृता मुंबईत राहते तर हिमांशू दिल्लीत राहतो. आणि दोघेही वेगळे राहण्याचं कारण अभिनेत्रीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. हिमांशू त्याच्या कामानिमित्त दिल्लीत राहत असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. मात्र कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून तो वेळात वेळ काढत मुंबईला अमृतासहही वेळ घालवताना दिसतो.

Tags: amruta khanvilkar himanshu malhotraamruta khanvilkar husband birthdayAmruta Khanvilkar On Husbandentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Baby Shower Scientific Reason

कार्तिकी गायकवाडचं राजेशाही थाटामाटात डोहाळ जेवण संपन्न, सातव्या महिन्यात का केला जातो हा खास सोहळा?, काय सत्य काय असत्य…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.