मंगळवार, जून 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा संगीतक्षेत्रातील मानाच्या पुरस्काराने सन्मान, लेकीचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “श्री संत एकनाथ महाराजांचा आशीर्वाद…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 2, 2024 | 1:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kartiki Gaikwad's father has been awarded Shri Sant Eknath Maharaj Swar Martand Award

कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा संगीतक्षेत्रातील मानाच्या पुरस्काराने सन्मान, लेकीचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, "श्री संत एकनाथ महाराजांचा आशीर्वाद..."

‘सारेगमप लिट्ल चॅम्पस’ची विजेती व लाईव्ह गाण्याचे शो करणारी कार्तिकी गायकवाडच्या आयुष्याच्या एका नवीन प्रवासाला नुकतीच सुरुवात झाली आहे. गायिका लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर ओटीभरणाचे खास कार्यक्रम शेअर करत तिने आई होणार असल्याची खुशखबर चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यामुळे लवकरच कार्तिकी गायकवाडच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामुळे तिच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. अशातच यात आणखी एका आनंदी बातमीची भर पडली आहे. कार्तिकीच्या वडिलांना नुकताच एक पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्कारासंबधी एक खास पोस्ट कार्तिकीने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.  

कार्तिकीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या वडिलांचे खास फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोसह तिने असं म्हटलं आहे की, “१ एप्रिल २०२४ रोजी पंडीत कल्याणजी गायकवाड यांना श्री संत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. आयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोष्याध्यक्ष आचार्य गोविंद गिरीजी यांच्या शुभहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कल्याणजी गायकवाड यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे साक्षात श्री संत एकनाथ महाराजांचा आशीर्वादच आहे.” कार्तिकीने वडिलांना पुरस्कार मिळाल्याच्या आनंद या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – “अविनाशच चांगला डान्स करतात आणि…”, ऐश्वर्या नारकरांनी या वयातही रिल बनवण्यामागचं सांगितलं कारण, म्हणाल्या, “नवरा-बायकोचं नातं…”

लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड तिच्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. कार्तिकीला बालपणापासून गाण्याची आवड होती. घरातूनच तिला गाण्याचं बाळकडू मिळालं आहे आणि हे बाळकडू तिला तिच्या वाडिलांकडूनच मिळाले आहे. कार्तिकीचे वडील पंडित कल्याणजी गायकवाड हे गायक व संगीतकार आहेत आणि त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आणखी वाचा – “नशेत त्याला कसंही मारतात, इजा करतात अन्…”, जोगेश्वरीमधील कुत्र्याचे हाल पाहून भाऊ कदमांची लेक संतापली, म्हणाली, “त्याची रोजची फरपट…”

दरम्यान, कार्तिकी नुकतीच तिच्या आई होणार असल्याच्या खुशखबरमुळे चर्चेत आली होती. अशातच आता तिच्या वडिलांना हा पुरस्कार मिळाला असल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामुळे गायिकेवर व तिच्या वाडिलांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

Tags: kartiki gaikwadKartiki Gaikwad Fathermarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
 India Women vs Pakistan Women
Women

भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय

जून 15, 2026 | 11:40 am
urmila matondkar ex husband nikaah
Entertainment

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

जून 15, 2026 | 11:00 am
Kap Bashi Trailer
Entertainment

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, ‘कप बशी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

जून 15, 2026 | 9:57 am
Next Post
Aai Kuthe Kay karte Promo

आशुतोषच्या आईने अरुंधतीला जवळ न करणं किती योग्य?, आता पुन्हा अनिरुद्धच्याच घरी परतली, मालिकेच्या कथानकला पुन्हा नवं वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.