बॉलिवूड हे खूप अस्थिर आहे. तिथे अनेक गोष्टी घडतात व बिघडतात देखील. यामध्ये अनेक नायक-नायिकांच्या अफेअरच्या चर्चाही ऐकायला मिळतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी प्रेमविवाह केला पण तरीही जास्त काळ त्यांचे लग्न टिकू शकले नाही. यातील एक नाव म्हणजे गेल्या चार दशकापासून बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री रेखा. रेखा यांनी मोठ्या व्यावसायिकाबरोबर लग्न केले पण काही महिन्यातच दोघांमध्ये घटस्फोट झाला. ( actress rekha husband suicide )
७०च्या दशकामध्ये रेखाचे नाव दिग्गज अभिनेत्रींमध्ये घेतले जात असे. पण अमिताभ बच्चन यांच्याबरोबर असलेल्या अफेअरच्या चर्चांमुळे त्या अधिक चर्चेत आल्या. अमिताभ यांनी अभिनेत्री जया भादुरी म्हणजे जया बच्चन यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. तरीही एका लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम केल्याने रेखा यांच्याबद्दल खूप चर्चा झाल्या. नंतर त्यांनी कोणत्याही अभिनेत्याशी लग्न न करता दिल्लीमधील एका मोठ्या व्यवसायिकाबरोबर लग्न केले. पण त्यांचा हा संसार अधिक काळ टिकू शकला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा यांनी १९९० साली दिल्लीतील मोठे व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याबरोबर जुहूमधील मुक्तेश्वर देवालय मंदिरात लग्न केले. पण लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच पतीबद्दल अनेक गोष्टी त्यांना समजू लागल्या. त्यामुळे सहा महिन्यातच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर काही बाबतीत दोघांमध्ये एकमत होत नव्हते. त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत वाद होत असत. या वादांना कंटाळून रेखा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे जेव्हा मुकेश यांना समजले तेव्हा त्यांना सहन झाले नाही आणि त्यांनी रेखाच्याच ओढणीने गळफास लाऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये मुकेश यांनी लिहिले होते की, “माझ्या मुलांचा सांभाळ मानसोपचारतज्ञांनी करावा. तसेच मी रेखासाठी काहीही सोडून जात नाही आहे. ती स्वतः कमाऊ शकते”. यावर रेखा यांच्यावर पुस्तक लिहिणारे यासिर उस्मान यांच्या मते सुसाइड नोटमध्ये रेखा यांचा त्यांच्या संपत्तीमध्ये रेखा यांचा हिस्सा नव्हता.
मुकेश यांच्या आत्महत्येनंतर दिल्लीतील माजी पोलिस कमिश्नर नीरज अग्रवाल यांनी सांगितले की,”रेखाने आपल्या पतीच्या संपत्तीमधील काहीही मागितले नाही. तसेच रेखाने पैशासाठी मुकेश यांच्याबरोबर लग्न केले आहे अशा चर्चा देखील झाल्या पण मुकेश यांच्या भावानेच असे नसल्याचे स्पष्ट केले.