गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आयरा खानच्या हातावर रंगली नुपूरच्या नावाची मेहंदी, आमिर खानच्या लेकीचा दिसला भलताच स्वॅग, व्हिडीओची तुफान चर्चा

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 8, 2024 | 5:23 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aamir khan daughter ira and nupur shikhare mehendi video viral on social media

Video : आयरा खानच्या हातावर रंगली नुपूरच्या नावाची मेहंदी, आमिर खानच्या लेकीचा दिसला भलताच स्वॅग, व्हिडीओची तुफान चर्चा

आमिर खानची लेक आयरा खान व नुपूर शिखरे हे दोघे नुकतेच कायदेशीर पद्धतीने विवाहबंधनात अडकले. मुंबईमधील ताज एंडस लँड या हॉटेलमध्ये या दोघांचे कायदेशीर पद्धतीने लग्न पार पडले. साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला असून आयरा-नुपूरच्या जवळच्या नातेवाईकांच्या व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. आयरा-नुपूर यांच्या या अनोख्या लग्नाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. यानंतर हे दोघे त्यांचा शाही विवाहसोहळा करण्यासाठी जयपूरला रवाना झाले आहेत. (Ira Khan And Nupur Shikhare Wedding)

आयरा-नुपूर यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच आयराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. आयराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती मेहंदीसाठी तयार होताना पाहायला मिळाली. यावेळी ती वॉकी टॉकी हातात घेऊन तयारीदरम्यान तिची हेरगिरी करणाऱ्या टीमची तक्रार करत होती. या व्हिडीओमध्ये एकीकडे आयरा मेहेंदी लावत आहे तर दुसरीकडे इतर सर्व पाहुणे मस्ती करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – Video :…अन् किरण रावने गाणं गाताच नवऱ्याबरोबर डान्स करु लागली आमिर खानची लेक, संगीत मैफिल रंगली आणि…

अशातच आयराचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आयराच्या हातावर मेहेंदी काढली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आयराचा मेहंदीचा एक फोटोही समोर आला आहे. आयराने मेहंदीसाठी घागरा चोळी परिधान केली आहे. पांढऱ्या रंगाचा सुंदर नक्षीकाम असलेला तिचा ब्लाउज लक्षवेधी ठरत आहे. आयरा-नुपूरच्या मेहंदी सोहळ्यामध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व पाहुणे कोडी, राजस्थानी संगीत आणि डीजे इत्यादी खेळांचा मनमुराद आनंद घेत आहेत.

आणखी वाचा – आमच्या आत्मनिर्भरतेवर गदा…”, मालदीव विरुद्ध लक्षद्वीप वादात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही उडी, पोस्ट शेअर करत म्हणाले, “आम्ही भारत…”

दरम्यान, आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. कोर्ट मॅरेजनंतर १० जानेवारी रोजी उदयपूरमध्ये रीतीरिवाजांसह त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. ७ जानेवारीपासून त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून १० जानेवारीला त्यांच्या शाही विवाहसोहळ्याने याची सांगता होणार आहे.

Tags: मनोरंजन बातमीआयरा खान-नुपूर शिखरे लग्न बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे लग्नाचे फोटोआयरा खान-नुपूर शिखरे लग्नाचे व्हिडिओ फोटोaamir khanBollywood entertainment newsira khanIra Khan and Nupur Shikhare Wedding Picturesira khan mehendiMarathi newsNupur Shikhare Wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Kranti redkar teased husband Sameer wankhede actress video shared on instagram

Video : “मला त्रास देऊ नको...”, क्रांती रेडकरवर भडकले समीर वानखेडे, तरीही व्हिडीओ शूट करत राहिली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.