‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये सहभागी झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट नेहमी चर्चेत असते. बिग बॉसच्या घरातील तिची स्पष्टवक्तेपणाची शैली प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. अलीकडेच पूजाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत वक्तव्य केलं आहे. यातील अनेक वर्ष बराच चर्चेत राहिलेला विषय म्हणजे लिपलॉक किसवर तिने वक्तव्य केले आहे. पूजाने तिचे वडील चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्याबरोबर केलेली लिपलॉकबद्दल नुकतच वक्तव्य केलं आहे. त्याबद्दल नुकताच तिने मोठा खूलासा केला आहे.(Pooja on lip kiss with her father)
९० च्या दशकात पूजा भट्ट व महेश भट्ट यांनी एका मॅगझीनसाठी फोटोशूट केला होता. त्यावेळी दोघेही लिपलॉक करताना दिसले होते. दोघांच्या या फोटोची बरीच चर्चा झाली. या फोटोमुळे देशभरात बरीच कॉन्ट्रोवर्सी पहायला मिळाली होती. हा मुद्दा जास्त चर्चेत आला तो महेश यांच्या एका वक्तव्यामुळे. जेव्हा महेश भट्टने सांगितलं की, “जर पूजा भट्ट माझी मुलगी नसती तर मी तिच्याबरोबर लग्न केलं असतं”. या वक्तव्यामुळे हा विषय बराच चर्चेत राहिला होता.
पूजाने या विषयावर खुलासा करताना सांगितलं की, “तो एक क्षण होता. जो खूप सुंदर प्रकारे टिपला गेला होता. जेव्हा लोकं वडील-मुलीच्या नात्याला चुकीच्या नजरेने पाहतात तर मग ते काहीही बोलू शकतात. मी त्या लोकांना हेच सांगेन की, तुम्ही जे काही आता बघितलं व वाचलं असं पुढेही तुम्ही त्याच प्रकारच्या गोष्टी बघाल आणि वाचाल”.
पूजा पुढे सांगते की, “कोणत्याही गोष्टीच्या चांगला व वाईट असा दोन बाजू असतात. मला आठवतय की एकदा शाहरुख खानने मला सांगितलं होतं की मुली कधीही आपल्या आई-वडिलांना किस द्यायला सांगतात. मी आजही स्वतःला एक लहान मुलगी समजते आणि मी नेहमी माझ्या वडिलांसाठी लहान मुलगीच राहीन. माझे वडील सुद्धा तिच व्यक्ती राहणार जे ते नेहमी होते”.पूजाचं हे वक्तव्य सोशल मीडियावर बरच व्हायरल होत आहे.