आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मौनी रॉय. मौनीने छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं आहे. छोट्या पडद्याबरोबरच अभिनेत्रीने बॉलिवुडमधील अनेक चित्रपटांत काम करत चाहत्यांना वेड लावलं आहे. मौनी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या लुकनेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. मौनी रॉयची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सोशल मीडियावरील ती प्रचंड सक्रिय असते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Mouni Roy On Instagram)
मौनीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अत्यंत बोल्ड आहे. मौनी सध्या तिच्या नवऱ्यासह सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहे आणि या सुट्ट्यांदरम्यान तिने नवऱ्याबरोबर बिकिनीवरील काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नवऱ्यासह स्विमिंग पूलमध्ये आनंद घेत आहे. आणि हा आनंद घेतनाचा व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “उठणे, कॉफी पिणे, पोहणे, खाणे, वाचणे आणि हेच पुन्हापुन्हा करणे” असं म्हणत तिने हे खास व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र, तिने शेअर केलेल्या या फोटो व व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.
आणखी वाचा – “माझं पुढील आयुष्य…”, आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट, म्हणाली, “तू सर्व काही…”
मौनीने शेअर केलेल्या या फोटो व व्हिडीओमध्ये ती अत्यंत बोल्ड अवतारात पाहायला मिळत आहे. तिची झीरो फिगर पाहून एका नेटकऱ्याने “हिची आई हिला जेवायला देत नाही का?” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने “ही फिटनेस नाही, ही तर कमजोरी आहे” अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी “थोडी लाज बाळग, कधीतरी पूर्ण कपडे घालत जा, हे सगळं सोशल मीडियावर दाखवायची गरज आहे का?” अशा अनेक कमेंट्स करत तिच्यावर निशाणा साधला आहे.
आणखी वाचा – मावळता सूर्य, रोमँटिक गप्पा अन्…; एकमेकांच्या प्रेमात हरवले नारकर कपल, खास व्हिडीओ केला शेअर
मौनीला सोशल मीडियावरील तिच्या फोटो किंवा व्हिडीओमुळे ट्रोल करण्यात आल्याचे हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधीही मौनीला तिच्या बोल्ड लुकमधील फोटो व व्हिडीओमुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अशातच आता नवऱ्याबरोबरच्या बोल्ड लुकमधील फोटो व व्हिडीओमुळे अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.