झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत सतत ट्विस्ट येत असतात. मालिकेचे कथानक आणि एजे व लीला ही पात्रे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. अशातच या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून यश व श्वेताच्या लग्नाची तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. हे लग्न स्वत: एजेने ठरवले आहे. यशचे लीलाची बहीण रेवतीवर प्रेम असते. मात्र, दुर्गाच्या दबावामुळे यश व रेवती एजेला खरे सांगत नाहीत. आता मात्र मालिकेत ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे यश श्वेताबरोबरच्या साखरपुड्यातून गायब होणार आहे. (Navri Mile Hitlarla Serial Updates)
मालिकेच्या बुधवारच्या भागात पाहायला मिळाले की, “एजेंनी लीलाला एका खोलीत राहण्याची शिक्षा दिली आहे. त्यानुसार लीला या खोलीत आहे. पण तिला यशचा श्वेताबरोबर होणारा साखरपुडाही थांबवायचा आहे. त्यामुळे लीला यशच्या खोलीबाहेर जाते आणि त्याला त्याचा साखरपुडा थांवण्यासाठीची युक्ती सांगते, मात्र यश आधी ऐकत नसतो. त्यामुळे लीला त्याला खोलीच्या दरवाज्याखालून एक चिठ्ठी टाकते, ज्यात लिहिलेलं असतं की, यश हा साखरपुडा टाळण्याचा माझ्याकडे एक उपाय आहे. ज्यामुळे तुला काही सांगावं लागणार नाही आणि हा साखरपुडाही टळेल”. यानंतर हे दोघे प्लॅन करतात. पण त्यांच्यात दुर्गा येते.
आणखी वाचा – लग्नाचे आमिष दाखवून शोषण, ‘पुष्पा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्यावर महिलेचे आरोप, नेमकं प्रकरण काय?
यानंतर श्वेताबरोबर होणाऱ्या साखरपुड्यातून यश अचानक गायब होणार आहे. दुर्गाला वाटतं या सगळ्यात लीलाचा हात असेल पण तसं काही घडताना दिसत नाहीये. याच ट्विस्टचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात दुर्गा असं म्हणते की “यश पळून गेलेला नाही, त्याला लीलाने तिच्याबरोबर पळवलं आहे”. यावर एजे असं म्हणतात की, “मी तर लीलाला खोलीत थांबण्याची शिक्षा दिली आहे”. त्यानंतर दुर्गा एजेंबरोबर तिच्या खोलीत जाते. तेव्हा लीला तिथेच हजर असते.
आणखी वाचा – ऐश्वर्या रायने ‘बच्चन’ आडनाव काढले? दुबईमधील ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण, नात्यातील तणाव आणखी वाढला
त्यामुळे दुर्गाला मोठा धक्काच बसतो. तसंच हे सगळं लीलाने केलं नाही तर नेमकं कुणी केलं? असाही प्रश्न तिला पडतो. त्यामुळे आता श्वेताबरोबरच्या साखरपुड्यातून यश नेमका कसा गायब झाला? गायब होउण यश नक्की कुठे गेला आहे? यश व रेवती यांचं लग्न लावण्यात लीला यशस्वी होणार का? आणि लीलाची ही चाल एजेंना कळणार का? हे आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.