शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याला व्हॅनिटी व्हॅनबाहेर श्रेया बुगडेला पाहताच मलायका अरोराने काय केलं पाहा, म्हणाली, “माझ्यासाठी…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 21, 2023 | 6:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Malaika Arora and Shreya Bugde spotted in Zee Marathi Awards

Video : 'झी मराठी पुरस्कार' सोहळ्याला व्हॅनिटी व्हॅनबाहेर श्रेया बुगडेला पाहताच मलायका अरोराने काय केलं पाहा, म्हणाली, "माझ्यासाठी…"

‘झी मराठी’ वाहिनीचा ‘झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार’ सोहळा म्हणजे डोळ्यांची पारणं फेडणारा सोहळा. मालिकेतील कलाकारांचे दर्जेदार सादरीकरण व या सोहळ्याला येणारी विविध क्षेत्रातील पाहुण्यांची उपस्थिती यांमुळे हा सोहळा अधिक रंगारंग ठरतो. त्याचबरोबर, बॉलिवूडमधील कलाकार मंडळींची या सोहळ्याला होत असलेली उपस्थिती सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. (Malaika Arora and Shreya Bugde spotted in Zee Marathi Awards)

नुकतंच ‘झी मराठी पुरस्कार २०२३’ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी झी मराठीच्या मालिकांमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. त्याचबरोबर, सिनेविश्वातील कलाकारांसह अनेक बॉलिवूड कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. अभिनेत्री माधुरी दीक्षित व मलायका अरोरा यांनी यंदाच्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याला विशेष हजेरी लावली होती. त्यांचे अनेक फोटोज व व्हिडीओज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. असाच एक व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये मलायका आणि ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडे यांच्यात संवाद होताना पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा – Video : …अन् दुर्गा पूजादरम्यान स्टेजवरुन थेट खाली पडली काजोल, व्हिलचेअरवर असलेल्या व्यक्तीवरच गेला तोल, लेक लगेच उठून आला आणि…

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, मलायकाने सोनेरी रंगाची साडी, त्यावर मॅचिंग असे दागिने परिधान केले होते. मलायका व्हॅनिटी व्हॅनवरून उतरताना दिसली. तर, श्रेया पुढच्या सादरीकरणाची तयारी करत होती. यावेळी मलायका पापाराझींना पोझ देत मंचाच्या दिशेने जात असताना काही वेळ थांबली. आणि श्रेयाला पाहताच तिने स्मित हास्य करत श्रेयाची विचारपूस केली. श्रेयादेखील तिला हॅलो म्हणताना दिसली आहे. श्रेया आणि मलायकाचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहे.

हे देखील वाचा – Video : मंचावर माधुरी दीक्षितबरोबर थिरकली ‘नवा गडी नवा राज्य’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “ती आली तिने पाहिलं आणि…”

अभिनेत्री श्रेया बुगडेने हा व्हायरल व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “जेव्हा मलायका अरोरा मला “हाय, हॅलो” करतात. अविस्मरणीय क्षण होता तो माझ्यासाठी.”, अशी भावना तिने यावर व्यक्त केली. दरम्यान, या सोहळ्यात प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार? कोणकोणते कलाकार हा पुरस्कार जिंकणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: chala hava yeu dyamalaika aroraMalaika Arora and Shreya Bugde spotted in Zee Marathi Awardsshreya bugdezee marathi awards
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Swara bhaskar share emotional post

"गाझामध्ये जर माझ्या मुलीचा जन्म झाला असता तर…", लेकीबरोबरचा फोटो शेअर करत अस्वस्थ अवस्थेत दिसली स्वरा भास्कर, म्हणाली, "शाप घेऊन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.