बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली आहे. सप्टेंबर महिन्यात तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या ती आपल्या मातृत्वाचा नवा प्रवासाचा आनंद घेताना दिसते आहे. स्वराचे नवीन चित्रपट जरी येत नसले तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींसंबंधित पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच तिने तिच्या मुलीबरोबरचा फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यात तिने इस्त्राईलमधील चिंताजन्य परिस्थितीवर आधारीत ही पोस्ट लिहिली आहे. (Swara bhaskar share emotional post)
स्वराने तिच्या सोशल मीडियावरून एक फोटो शेअर केलं. त्यात तिची मुलगी राबियाला मांडीवर घेऊन तिच्याकडे पाहत असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने एक भलीमोठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
त्यात ती लिहीते, ‘कोणत्याही नवीन आईला माहितच असेल की ती तिच्या नवजात बाळाकडे शांततेत आणि आनंदाने अगदी तासंतास एकटक पाहू शकते. मी पण काही वेगळी नाही. मला खात्री आहे की जगभरातील अनेक आईंप्रमाणे, जेव्हा आपण आपल्या बाळाकडे पाहतो तेव्हा आपल्याला जाणवणाऱ्या भावना आता सतत भीतीदायक विचारांनी व्यापलेली असते. ज्याकडे दुर्लक्ष करणं आता कठीण झालं आहे’.
स्वरा पुढे लिहीते, ‘मी माझ्या मुलीच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहते आणि विचार करते की जर तिचा जन्म गाझामध्ये झाला असता तर… मी तिचं रक्षण कसं केलं असतं? अशा कठिण परिस्थितीत ती कधीच अडकू नये हिच प्रार्थना मी नेहमीच करत राहीन. पण मग ती कोणता आशीर्वाद घेऊन जन्माला आली याचाही विचार मी करते. याबरोबरच गाझाची मुलं मग कोणता शाप घेऊन जन्माला येत आहेत असाही विचार माझ्या मनात डोकावतो. आता सर्वांनी अशा देवाकडे प्रार्थना करा जो तुमची हाक ऐकेल. गाझामधील मुलांचे दुःख, वेदना आणि मृत्यूपासून वाचवेल कारण हे जग काही त्यांचं रक्षण करणार नाही’, अशी भावनिक पोस्ट लिहीत तिने इस्त्राईलमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.