बॉलिवूडमध्ये सध्या प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री क्रिती सेनॉन प्रेमाच्या चर्चांमुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून तिच्या सर्व भूमिकांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी ती वाढदिवसाच्या निमित्ताने परदेशात गेली होती. यावेळी तिच्याबरोबर तिचा बॉयफ्रेंड असल्याच्या अनेक चर्चादेखील झाल्या. मात्र या सगळ्यावर अभिनेत्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. आशातच आता तिच्याबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. (kriti sanon rumoured boyfriend)
क्रिती आता भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या कुटुंबाचा भाग होणार आहे. ती आता साक्षी धोनीच्या जवळच्या नातेवाईकाला डेट करत असल्याचेही समोर आले आहे. याआधी दोघांच्याही नात्याबद्दल अफवा होती मात्र आता या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. क्रीती सध्या राम बहियालं डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता कबीरने असं काही केलं आहे ज्यामुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
धोनी व कबीरच्या नात्याबद्दल सांगायचे झाले तर कबीर हा साक्षीचा भाऊ व धोनीचा मेहुणा आहे. धोनीच्या नव वर्षाच्या पार्टीमध्ये क्रिती तिची बहीण नूपुरसह सहभागी झाली होती. त्यावेळी अक्षय कुमारने कबीर व क्रितीची ओळख करवून दिली होती. त्यानंतर त्यांचे एकत्रित फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी क्रितीने एका स्टेडियममध्ये परफॉर्म करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओवर कबीरने “I am dead” अशी प्रतिक्रिया दिली होती. हे बघून आता त्यांच्यामध्ये नातं असल्याचे निश्चित असल्याचं अनेकांनी म्हंटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कबीर हा क्रितीपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. अभिनेत्रीचं वय ३४ वर्ष असून कबीर २५ वर्षांचा आहे. कबीर हा युकेमध्ये त्याचा फॅमिलि बिजनेस सांभाळत आहे. त्याचे एकूण उत्पन्न ४२७ मिलियन असल्याचेदेखील समोर आले आहे.