Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीजन सुरु होऊन आता जवळपास ३० दिवस उलटले आहेत. या घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासून घरातील काही स्पर्धकांमध्ये मैत्री पहायला मिळाली तर काहींमध्ये मैत्रीतील प्रेम. मात्र आता तेच नाते हळूहळू बदलतानादेखील पहायला मिळत आहे. या घरातील नात्यांची समीकरण कधी बदलतील हे सांगू शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून अभिजीत व निक्की यांची मैत्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यांची ही मैत्री घरातील इतर स्पर्धकांना खटकतही आहे. यावरुन घरात निक्की-अभिजीतविरुद्ध अनेकदा भांडणही झालं आहे. अशातच आता अभिजीतच्या एका कृतीमुळे हे दोघे पुन्हा एकदा चर्चेचं कारण ठरले आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अभिजीत निक्कीला त्याचं जॅकेट काढून देणार आहे. त्याची ही कृती बघून घरातील काही सदस्य त्यांच्यावर हसत आहेत. मात्र या सदस्यांची ‘बिग बॉस’ शाळा घेणार आहे. घरातील लिव्हिंग एरियात सर्व सदस्य बसलेले असताना निक्कीला थंडी वाजते. म्हणून ती अभिजीतलं थंडी वाजत आहे असं म्हणते. यावर अभिजीत निक्कीला त्याचं जॅकेट हवं आहे का? असं विचारतो आणि जॅकेट काढून देतोदेखील. अभिजीत तिला जॅकेट काढून देत असताना डीपी व अंकिता त्यांच्याकडे बघत असतात.
अभिजीतने निक्कीला जॅकेट दिलेलं पाहून डीपी व अंकिता हसू लागतात, त्यांचं हे हसणं पाहून बिग बॉस त्यांना “फार हसू येतंय? काय जोक झाला टों मलाही सांगा” असं विचारतात. यावर डीपी बिग बॉसला काही झालं नाही असं म्हणतात. यानंतर बिग बॉस असं म्हणतात की, “मी सांगू का तुमच्या मनात काय आहे?”. त्यामुळे आता हे दोघे नक्की कशावर हसत आहेत आणि बिग बॉस त्यांना काय सांगणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाल्यानंतरही सुप्रसिद्ध अभिनेत्री त्याच्या प्रेमात, म्हणाली, “तो मला…”
दरम्यान, निक्की व अभिजीत यांच्यात गुरुवारच्या भागात काही कारणावरुन वाद झाले. यात अभिजीतने निक्कीबरोबर बंधनात रहायला दोन वेळा नकारही दिला. मात्र बिग बॉसच्या अंतिम निर्णयामुळे त्याला पुन्हा तिच्याबरोबरच्या बंधनात अडकावे लागले. त्यात अरबाजनेदेखील निक्कीबरोबरचे त्याचे नाते सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता या त्रिकुटामध्ये काय होणार?हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.