सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्की एकत्र आल्यानंतर प्रेक्षकांनी टीम बी व जान्हवी-वैभवला सुनावलं, म्हणाले, “हेच बघून तुम्ही आता…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 30, 2024 | 12:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 nikki tamboli and arbaaz patel troll

'बिग बॉस'च्या घरात निक्की-अरबाज एकत्र, प्रेक्षकांचा संताप

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात असं पाहायला मिळालं की, ‘बिग बॉस’ यांनी मानकाप्याच्या खाणीतून सोन्याची नाणी गोळा करण्याचा टास्क स्पर्धकांना दिला होता. या टास्क दरम्यान टीम बी विजयी ठरली असल्याच पाहायला मिळालं. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात असं चित्र पाहायला मिळालं ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला. गेल्या आठवड्याभरापासून निक्की तांबोळी व अरबाज पटेल यांच्यात होणारे वाद पाहता ते दोघे पुन्हा कधीच एकत्र येणार नाहीत असे वाटत होते. मात्र, आता हे चित्र काहीस वेगळं असल्याच दिसत आहे.

अखेर अरबाज निक्कीजवळ येताच माफी मागत तिला जवळ घेत असल्याच पाहायला मिळत आहे. निक्की सुरुवातीपासूनच अरबाजची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती मात्र अरबाज तिचं काहीच ऐकून घेत नव्हता आणि घरातील मंडळीही निक्कीला अरबाजपर्यंत पोहोचू देत नव्हती. मात्र अखेर निक्की व अरबाज यांची गाठ पडली असून आता दोघांनी त्यांच्यातील वाद मिटवला असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच दोघांनी एकत्र येत एकमेकांना जवळ घेतलेलं ही पाहायला मिळालं. निक्की व अरबाजच्या एकत्र येण्यावर आता प्रेक्षक मंडळींनीही कमेंट करायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : आदित्यसमोर येणार दिशाचा खरा चेहरा, प्रिया-प्रीतमच्या नात्याला मान्यता देत शिकवणार धडा, मोठा ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

प्रेक्षक मंडळींनी टीम बी आणि जान्हवी, वैभव यांना ट्रोल करत शेवटी निक्कीने सगळ्यांचीच मन जिंकली आणि अरबाजचही मन जिंकलं असं म्हणत तिची वाहवा केलेली पाहायला मिळतेय. तर काहींनी निक्की व अरबाजच्या गेम प्लॅनबद्दल नाराजी दाखवत दोघांना ट्रोल केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : माफी मागितली, एकमेकांना जवळ घेतलं पण…; निक्कीने अरबाजच्या प्रेमाला नाकारलं, म्हणाली, “डरपोक…”

“बाकीच्या लोकांसाठी आणि खासकरुन वैभव व जान्हवीसाठी दोन मिनिटची शांतता”, “अरबाज खरंच पायपुसणं आहे हे त्याने दाखवून दिलं”, “जान्हवी व वैभवचं तोंड बघायचंय”, “बाई हा काय नवीन प्रकार. एवढ्या लवकर जुळलं. बी टीम हे पाहिल्यावर उद्या मारतील”, “अरबाज, तू खरंच सिद्ध केलंस की तू दरवाजाच्या पायपुसण्यासारख आहेस. आता निक्की तुला रिमोट कंट्रोलच्या खेळण्यासारखं ऑपरेट करत आहे”, अशा अनेक कमेंट आलेल्या पाहायला मिळत आहेत.

Tags: arbaaz and nikki trollbigg boss marathibigg boss marathi 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates Dhananjay Powar and Ankita Walawalkar laugh as Abhijeet Sawant gives his jacket to Nikki Tamboli

Bigg Boss Marathi : निक्कीला थंडी लागताच अभिजीतने काढून दिले स्वत:चं जॅकेट, डीपी-अंकिता हसू लागले अन्...; नक्की चूक कोणाची?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.