Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या या पर्वात स्पर्धकांच्या चुकीमुळे पहिल्या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्क झाला आणि त्यामुळे पहिल्या आठवड्याच्या कॅप्टन पदाला स्पर्धकांना मुकावं लागलं. त्यानंतर आता सलग दुसऱ्या आठवड्यात सर्वानुमते कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिला कॅप्टन करण्यात येत. अंकिता तिच्या तिच्या पद्धतीने घरातील काम स्पर्धकांना वाटून देते. अंकिताने पहिला कॅप्टन होण्याचा मान पटकावल्याने तिच्या टीममधील स्पर्धक चांगलेच खुश असतात.
अंकिता आता कॅप्टन पदानुसार घरात काम वाटून देताना दिसत आहे. मात्र दुसऱ्या टीममधील घनःश्यामला अंकिताने वाटून दिलेलं काम मान्य नसत. तो यावरुन अंकिताबरोबर बोलत काम करणार नसल्याचं स्पष्ट सांगतो. अंकिताने घनःश्यामला घरातील कचरा काढण्याची ड्युटी दिलेली असते. यावरुन घनःश्याम व अंकिता यांच्यात वाद सुरु असतात. एकूणच हा वाद पाहता घनःश्याम अंकिताने दिलेली ड्युटी करायला तयार नसतो. अंकिता घनःश्यामला ड्युटीबद्दल समजावून सांगत असते. मात्र घनःश्यामला अंकिताने वाटून दिलेलं काम मान्य नसतं.
अंकिता घनःश्यामला म्हणते की, “एकच ड्युटी तुला दिली आहे. आणि त्यात आलटून पालटून ती ड्युटी कर”. यावर घनःश्याम म्हणतो, “आलटून पालटून नको तर मला एकच काम दे”. यावर अंकिता म्हणते, “मग तू बाहेरच कर. एकावरच अन्याय नको म्हणून मी असं सांगत आहे. मला घरात भांडण नको आहे. मी घरात कमी भांडण कशी होतील यासाठी बोलत आहे”. यावर घनःश्याम अंकिताला म्हणतो, “मग बाहेर मला एकट्याला जमणार नाही. मला बाहेर दोन माणसं लागतील”.
यावर अंकिता म्हणते, “ते मिळून करायचं आहे. तुम्ही तुमच्यामध्ये निर्णय घ्या. मोठं काम नाही आहे. पंधरा मिनिटांचं काम आहे. पतारो नाय गोळा करुचो हा”, असंही ती मालवणी भाषेत बोलून जाते. आणि ही ड्युटी करणार की नाही असा सवाल करते. यावर घनःश्याम म्हणतो, “नाही”. आता घनःश्यामने नकार दिल्यानंतर अंकिता ही परिस्थिती कशी हाताळणार हे पाहणं रंजक ठरेल.