बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. करीनाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘रेफ्यूजी’ या चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. यामध्ये तिच्याबरोबर अभिषेक बच्चनदेखील दिसून आला होता. त्यानंतर ‘कभी खुशी कभी गम’, ‘जब वी मेट’ या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. आता पुन्हा एकदा एका एका भूमिकेमुळे ती चर्चेत आली आहे. सध्या बहुचर्चित चित्रपट ‘सिंघम अगेन’ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये तिने आपली स्वतःची तुलना सीता मातेबरोबर केल्याने त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. (kareena kapoor on sita mata)
‘सिंघम अगेन’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये अजय देवगण, दीपिका पदूकोण, रणवीर सिंह, अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेल्या पाहायला मिळाल्या. या ट्रेलरला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला. यामध्ये करीना साडीमध्ये दिसून आली तसेच रामायणाबद्दल सांगतानादेखील दिसत आहे. त्यानंतर लगेचच सोशल मिडीयावर तिचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला प्री-ड्रेप साडी नेसली आहे. या साडीमध्ये कोर्सेट पदर आहे. यामध्ये ऑफ शोल्डर लूक येत आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
तसेच यानंतर तिने ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाबद्दल भाष्य करताना केलेल्या वक्तव्यामुळेही चर्चेत राहिली आहे. तिने स्वतःची तुलना सीता मातेबरोबर केली आहे. ती म्हणाली की, “रामायणामध्ये सीता नाही असं होऊच शकत नाही. तसेच रोहित शेट्टीच्या चित्रपटात करीना कपूर नाही असंही होऊ शकत नाही”.
करीनाच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “वाह, काय उदाहरण दिलंय. मी आजवर असं उदाहरण नाही ऐकलं”. तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “खूप बकवास आहे. ही अशी कशी तुलना करु शकते?”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “हे रोहितने शिकवलंय”. नंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “पटौदी घराण्याची सून आणि तुलना सीता मातेशी?”. दरम्यान करीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.