‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष चर्चेत राहिलं. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदावर गोलीगत फेम सूरज चव्हाणने नाव कोरलं तर उपविजेतेपदाचा बहुमान हा गायक अभिजीत सावंतने पटकावला. सध्या दोघांवर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील या टॉप-२ सदस्यांची चर्चा सुरु आहे. या विजेतेपदाचं सर्वत्र सेलिब्रेशन होताना पाहायला मिळत आहे. नुकतीच सूरज व अभिजीतने मुंबईतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले असल्याचेही समोर आले आहे. (Abhijeet Sawant Video)
‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं हे पर्व १०० दिवसांचं नसून ७० दिवसांचं असल्याचं समोर आलं. मात्र हा ७० दिवसांचा खेळही काही सोप्पा नव्हता. विविध क्षेत्रातील मंडळींसह एकत्र राहत वेगवेगळे स्वभाव जुळवून घेत राहणं हे कठीण होतं. हा इतकंच नव्हे तर घरात शिजणाऱ्या पदार्थांवरुनही अनेकदा वाद झाले. यावेळी सगळेच स्पर्धक घरच्या अन्नाला, घराच्या खाद्य पदार्थांना मिस करताना दिसले. मात्र आता घरातून बाहेर आल्यानंतर हे स्पर्धक घरच्या जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत.
घरच्या जेवणाचा आनंद घेतानाचा एक व्हिडीओ अभिजीत सावंतने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत तब्बल ७० दिवसांनी घरच्या जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. अभिजीतने हा व्हिडीओ शेअर करत त्याच्या बायकोचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत घरात निवांत दिसतोय. ‘बिग बॉस’च्या घरातही अभिजीत त्याचा टास्क उत्तम खेळताना दिसला. आता घरी परतल्यावर तो घरातल्यांना वेळ देताना दिसत आहे. काल अभिजीतचा वाढदिवस होता तेव्हा त्याने कुटुंबासह त्याचा हा खास दिवस साजराही केला.
आणखी वाचा – आबासाहेब व अहिल्यादेवींच्या नात्यातील दुरावा येणार का समोर?, पारूच्या जीवालाही धोका अन्…
“७० दिवसानंतर पोहा ते मालपोहा. हा बदल खूपच भारी वाटतं आहे. अखेर घरी आलो आणि घरचं जेवण जेवतोय. थँक यु बायको”, असं म्हणत अभिजीतने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओखाली निक्की तांबोळीने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. “मला पण पाहिजे”, असं म्हणत निक्कीने या व्हिडीओखाली कमेंट केली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात निक्की व अभिजीतची मैत्री पाहायला मिळाली.