सध्या अभिनेत्री कंगना रणौत अधिक चर्चेत आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळाली आहे. मात्र सध्या अभिनयाकडून तिने मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या विभागातून ती निवडून आली आहे. मात्र आता तिचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशाच्या माजी व दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये कंगनाचा लूक पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. (kangana ranaut on movie release)
कंगनाचा आगामी बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. येत्या ६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र प्रदर्शनाआधीच हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटामुळे कंगनाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तिने सांगितले आहे. याशिवाय तिने सांगितले की तिचा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे अडकला नसून बोर्डाची संमती मिळाल्याचे तिने सांगितले आहे.
#Emergency pic.twitter.com/Klko20kkqY
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 30, 2024
कंगनाने तिच्या X अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितले की, “आमचा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार झाला होता. पण चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रमाणपत्र मिळाले नाही. यासंबंधी खूप धमक्या मिळाल्या तसेच सेन्सॉर बोर्डलादेखील धमक्या मिळत आहेत. इंदिरा गांधी यांची हत्या दाखवू नये, जनरल सिंह भिंडरावाले यांना दाखवू नये, पंजाबमध्ये जी आंदोलनं झाली ती दाखवू नयेत या सगळ्यासाठी आमच्यावर दबाव आणला जात आहे. मला माफ करा. माझ्यासाठी ही वेळ आणि निर्माण झालेली परिस्थिती यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. हे देशाच्या एका राज्यामध्ये घडत आहे”.
दरम्यान आता या चित्रपटामध्ये इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लागलेल्या आणीबाणीचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात कंगनाबरोबर सतीश कौशिक, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण असे अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत.