सुप्रसिद्ध टेलिव्हिजन कार्यक्रम ‘इंडियन आयडॉल’च्या १२ व्या पर्वातील अंतिम स्पर्धक मोहम्मद दानिश हा सध्या अधिक चर्चेत आहे. त्याच्या घरी पुन्हा एकदा चिमुकल्याचे आगमन झाले आहे. २०२३ साली त्याने सोशल मीडियावर पाहिल्यांदा बाबा झाल्याची पोस्ट शेअर केली होती. यामध्येच त्याने मुलाचे काही फोटोदेखील शेअर केले होते. दानिश नुकताच ‘सुपरस्टार सिंगर ३’ या कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. आता पुन्हा एकदा बाबा झाल्याने त्याच्यावर एक अजून जबाबदारी आली आहे. (danish mohommad babyboy)
दानिशने त्याच्या कुटुंबामध्ये एका नवीन पाहुण्यांचे जंगी स्वागत केले आहे. त्याचा आनंद त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्याने तान्हुल्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटों शेअर करत त्याने लिहिले की, “देवाचे आशीर्वाद आहेत. यापेक्षा कोणतीही चांगली जाणीव नाही. तुम्ही दिलेल्या आशीर्वादासाठी धन्यवाद”.
दानिशने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच यावर चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. ‘इंडियन…’मधील त्यांच्या मित्रांनीदेखील त्याला शुभेच्छा दिल्या आहे. सलमान अलीने लिहिले की, “माशा अल्लाह, बाळाला चांगले आयुष्य मिळूदे”, विशाल मिश्राने लिहिले की, “दानिश खूप शुभेच्छा”, सायली कांबळेने देखील लिहिले की, “खूप शुभेच्छा दानिश, तुझ्यासाठी व फरहीन भाभीसाठी मी खूप खुश आहे”.
दानिशने २७ एप्रिल २०२३ साली फरहीनबरोबर लग्न केले. लग्नामध्ये सोनू निगम, राखी सावंत, पलक मुच्छल व जावेद अली हे दिग्गज सहभागी होते. दानिश पाहिल्यांदा ‘द व्हॉयस’च्या दुसऱ्या पर्वामध्ये दिसून आला होता. पण त्याला ‘इंडियन आयडॉल’मुळे अधिक पसंती मिळाली. हे पर्व खूप चर्चेत राहिले. सर्वच स्पर्धकांना खूप प्रसिद्धीदेखील मिळाली. यामध्ये दानिश अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. तो चौथ्या स्थानी होता. पवनदीप रंजन या पर्वाचा विजेता झाला होता.