गेल्या काही दिवसांपासून मल्याळम चित्रपटसृष्टी चांगलीच चर्चेत आली आहे. या इंडस्ट्रीत सध्या तणाव दिसून येत आहे. कारण अनेक महिला कलाकारांनी आपल्या सहकलाकारांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर या इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. यानंतर अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा खुलासा करण्यास सुरुवात केली आहे. या इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री आरोप धक्कादायक खुलासे करत आहेत. मात्र यावेळी एका तरुण अभिनेत्याने चित्रपट निर्माता रणजीत यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. केरस पोलिसांच्या हवाल्याने एएनआयला ही माहिती देण्यात आली असून त्याच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. (Actor Accuses Sexual Aarassment Case)
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, रणजीतने पीडित व्यक्तीला ऑडिशनसाठी बेंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. पण तिथे अभिनेत्याला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रणजीतने त्याला त्याचे सर्व कपडे काढण्यास सांगितले आणि नंतर मारहाण केली. पीडित व्यक्तीला वाटले की, त्याला ऑडिशनसाठी बोलावले आहे, पण नंतर खरी परिस्थिती त्याच्या लक्षात आली. पीडित व्यक्तीने असाही दावा केला आहे की, घटनेच्या दुसऱ्या दिवशी रणजीतने अभिनेत्याला पैशांची ऑफरही दिली होती. केरळ पोलिसांचा हवाला देत, एएनआयला सांगण्यात आले की अभिनेत्याने डीजीपी (पोलीस महासंचालक) यांच्याकडे तक्रार केली आहे, या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्याच्यावर माझा विश्वासच नाही” अंकिता-अभिजीतमध्ये फुट, कशावरुन झाले मतभेद?
न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालानंतर केरळ सरकारने अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. ज्यामध्ये ४ महिला पोलीस अधिकारीही आहेत. मल्याळम चित्रपट दिग्दर्शक रणजीत यांच्यावर यापूर्वीही आरोप झाले होते. काही दिवसांपूर्वी एका बंगाली अभिनेत्रीने त्यांच्यावर आरोप केले होते. तिने सांगितले की २००९ मध्ये त्याने तिला एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावले होते आणि तिच्याबरोबर गैरवर्तन केले होते. यानंतर रणजीतने केर फिल्म अकादमीचा राजीनामा दिला.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांनी मिळविला नवीन कॅप्टन पदाचा बहुमान, ‘ते’ सदस्य ठरले किंगमेकर
दरम्यान, मल्याळम चित्रपटसृष्टीही उत्तमोत्तम आशयघन चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी ओळखली जाते. पण सध्या हीच चित्रपटसृष्टी अत्यंत वाईट कारणामुळे चर्चेत आहे. न्या. हेमा समितीच्या अहवालाने ‘मॉलिवूड’मधील सरंजामी मनोवृत्ती चव्हाट्यावर आणली आहे. एका अभिनेत्रीचा विनयभंग आणि अपहरण केल्याप्रकरणी २०१७ मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालात मल्याळम चित्रपटसृष्टीविषयी बरेच धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत.