Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या सुरु असलेले वाद, अपमान अनेकांना खटकू लागले आहेत. यंदाच्या पर्वातील अभिनेत्री जान्हवी किल्लेकर विशेष चर्चेत आली आहे. जान्हवीची वागणूक अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना खटकू लागली आहे. निक्की तांबोळी बरोबर राहून जान्हवीने स्वतःला तिच्या छत्रछायेखाली घेतलं. जान्हवीच हे वागणं अनेकांना खटकलं. यापूर्वी तिच्या प्रत्येक चुकीनंतर रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची शाळा घेतली. जान्हवीला तिची चूक दाखवत तिची चांगलीच कानउघडणी केली.
यानंतर आता जान्हवीची आणखी चूक साऱ्यांनी पकडली असून विविध क्षेत्रातून तिला ट्रोल करण्यात आले आहे. जान्हवी टास्क दरम्यान अभिनेते पॅडी कांबळे यांचा अपमान केला. पॅडी यांना ती तिच्या कारकिर्दीवरुन बोलली असल्याचं समोर आला. सिनेसृष्टीतील कारकिर्दीवरुन जान्हवीने पॅडी यांचा अपमान केलेला अनेकांना खटकला. अनेक कलाकार मंडळींनी यावरुन पोस्ट शेअर करत टोला लगावला.

या प्रकारानंतर जान्हवीने पॅडी कांबळे यांची माफीही मागितली. माफी मागताना केलेली ओव्हर ऍक्टिंगही अनेकांना खटकली. यावरुन जान्हवी पुन्हा एकदा ट्रोल झाली. आता जान्हवीच्या या वागणुकीवर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. अभिनेत्री अनघा अतुलने एक पोस्ट शेअर करत जान्हवीला चांगलाच टोला लगावला आहे. “आज रंग माझा वेगळाचा एपिसोड वेगळ्याच शोमध्ये पाहिला. सीन असा होता की, विलन पकडली गेल्याने माफी मागत आहे. कडक सीन, कडक अभिनेत्री”, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
अनघा अतुल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अनघाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्टोरी शेअर करत तिने ‘बिग बॉस’मधील जान्हवी किल्लेकरच्या वागणुकीवर भाष्य केलं आहे. सध्या जान्हवी तिने केलेल्या अपमानावरुन चर्चेत आली असून अनेकजण तिला टोला लागवताना दिसत आहेत.