Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’मध्ये असं पाहायला मिळत आहे की स्पर्धक मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दोन गट पडलेले दिसत आहेत. एका गटात निक्की, अरबाज, वैभव, घनःश्याम, इरिना, जान्हवी हे स्पर्धक दिसत आहेत. तर दुसऱ्या गटात अंकिता वालावलकर, पॅडी कांबळे, अभिजीत सावंत, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार हे स्पर्धक दिसत आहेत. दोन्ही गटांत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अंकिता वालावलकरला तिच्या टीममधील अभिजीत सावंत विरोधात गॉसिप करताना दिसत आहे. ही गॉसिप ती दुसऱ्या टीममधील अरबाज पटेल, वैभव चव्हाण, घनःश्याम दरवडे या स्पर्धकांबरोबर करताना दिसत आहे. अंकिताने अभिजीतच्या न पटलेल्या स्वभावाबाबत जाऊन चुगली केलेली दिसत आहेत. याआधीही अंकिताने अभिजीतची एक खटकलेली गोष्ट बोलली होती. अंकिता म्हणाली, “पहिल्या आठवड्यातील पहिला टास्क. मी स्वतः बोलले होते की, वा अभिजीत सावंतने स्टॅन्ड घेतला. आठवतंय?”. यावर अरबाज हो म्हणतो.
यावर अंकिता म्हणते, “त्याच कारण. मी, निक्की, अभिजीत बसलो होतो. तेव्हा निक्की अभिजितला म्हणाली, तुझं ठीक आहे, माझं ठीक आहे. पण हिचं काय आपल्याबरोबर. ही आपल्याबरोबर येणार का?. तेव्हा अभिजीत काहीच बोलत नव्हता. जो माणूस आपल्याबरोबर असतो तो पहिल्या दिवसापासून असतो. त्याच्यानंतर मी त्याला विचारलं. त्यावर त्याच मत असं होतं की, तेव्हा त्याच कोणत्या ग्रुपमध्ये जायचं हे ठरलं नव्हतं. यावर अरबाज म्हणाला, “तुला मी एक सांगतो. त्याला एक प्रॉब्लेम आहे. सगळ्यांचं लक्ष केंद्रित करुन घ्यायचं. इकडे त्याला यायचं होतं पण इकडे त्याला अटेंशन मिळणार नाही, आणि ते अटेंशन त्याला तिकडे मिळणार म्हणून तो त्या ग्रुपमध्ये गेला”.
पुढे अरबाज असंही म्हणाला की, “आता ही तो तोच प्रयत्न करत आहे की तुमच्या ग्रुपमध्ये जाऊन त्याला वर्चस्व गाजवता येईल”. पुढे अंकिता म्हणाली, “मला तुझी मत नाही पटली तर तुला तोंडावर सांगते. सूरजला गेम का कळतो माहित आहे की, कारण आमच्या चर्चेत सूरज एकटा बोलतो की, दादा तू तिला घाबरतोस. हे सूरजच वाक्य आहे”.