बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या खूप चर्चेत आहे. नुकताच तिने राजकारणात प्रवेश केला असून हिमाचल येथील मंडी या भागातून ती खासदार म्हणून निवडून आली आहे. अभिनयापासून राजकारणापर्यंतचा तिचा प्रवास हा खूप अविश्वसनीय होता. तिच्या विजयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून तिच्यावर प्रेमाचा व कौतुकाचा वर्षाव केला आहे. बॉलिवूडसहित तिला अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण अशातच आता तिच्याबद्दलची नवीन बातमी समोर येत आहे. (Kangana ranaut get slaped)
विजयानंतर कंगनाला चंदीगढ एअरपोर्टवर महिला CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने कानाखाली मारली आहे. यावरुन आता कंगनाने भाष्यदेखील केले आहे. घडलेल्या सर्व प्रकारानंतर कंगना व महिलेमध्ये भांडणही झालेली पाहायला मिळाली आहेत. दरम्यान यावर आता महिला कॉन्स्टेबलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजकीय सल्लागारांच्या मते चंदीगढ एअरपोर्टवर कंगनाला कानाखाली मारण्यात आली आहे. त्यामुळे टया गार्डवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व कामावरून काढण्यात यावे अशी मागणीदेखील केली जात आहे.
#WATCH | BJP leader and actor Kangana Ranaut arrives at Delhi airport
— ANI (@ANI) June 6, 2024
A woman constable of CISF allegedly slapped Kangana Ranaut at Chandigarh Airport during a frisking argument. An inquiry committee comprising senior CISF officers has been set up to conduct a further… pic.twitter.com/EmrYPQgheH
घडलेल्या सर्व प्रकारानंतर व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कंगना एअरपोर्टवरुन बाहेर पडताना दिसत आहे. त्यावेळी माध्यमांनी सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र कंगनाने शांत राहणे पसंत केले आणि ती एअरपोर्टबाहेर निघून गेली.
दरम्यान कंगनाने यावर स्वतः भाष्य केले आहे. यामध्ये ती म्हणाली की, “मी एकदम ठीक आहे. आज जे चंदीगढ एअरपोर्टवर घडले ते सिक्युरिटी चेकच्या वेळी झालं. मी तिथे जेव्हा सिक्युरिटी चेकसाठी गेले तेव्हा दुसऱ्या एका केबिनमध्ये असणाऱ्या महिलेने मी तिथून जाण्याची वाट बघत होती. ती लगेचच माझ्या बाजूने आली आणि माझ्या कानाखाली मारले व शिव्या द्यायला लागली. असं का केलं? असं विचारलं असता ती म्हणाली की मी सगळं आंदोलनाच्या समर्थनार्थ केले आहे. पण मला असं वाटत की, पंजाबमध्ये आतंकवाद व उग्रवाद वाढत आहे. आपण हे सगळं कसं हाताळायचं?”.
या प्रकरणाला आता कोणते वळण लागते हे पाहाण्यासारखे आहे.