शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार?, काही कलाकारांची नावं समोर?, यावेळी शोमध्ये येणार मोठा ट्वीस्ट

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 6, 2024 | 6:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
big boss ott 3

'बिग बॉस ओटीटी'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार?, काही कलाकारांची नावं समोर?, यावेळी शोमध्ये येणार मोठा ट्वीस्ट

 टेलिव्हिजनवर ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाने सगळ्यांनाच वेड लावले. टेलिव्हिजनवर अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. टीव्हीवर या कार्यक्रमाला यश मिळाल्यानंतर हा कार्यक्रम ओटीटीवर सुरु करण्यात आला. सध्या ओटीटीवर या कार्यक्रमाचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या  भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन यावेळी सलमान खान करणार नसून अनिल कपूर करताना दिसणार आहे. आता यामध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची अंदाजित नावे समोर आले आहेत.  त्यामुळे यावेळचे पर्व खूप चर्चेत राहणार आहे. (big boss ott 3)

या वेळच्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाची आता लोक आतुरतेने वाट बघत आहेत. यावेळी बिग बॉसच्या घरात यावेळी कृती सेननची बहीण नूपुर सेनन, फरहान अख्तरची मेव्हणी अनुषा दांडेकर, तनुश्री दत्ता, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा उष्मेय चक्रवर्ती, हेमा मालिनीची मुलगी अहाना देओल, संजय दत्तची मुलगी त्रिशला दत्त व ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मधील भव्य गांधीदेखील दिसून येऊ शकतो. तसेच या शोमध्ये नक्की काय काय पाहायला मिळणार आहे? त्याबद्दलही आपण जाणून घेऊया.

आणखी वाचा – टीव्हीवर आली बिनधास्त मुलगीची आजी, सेलिब्रिटीही आहेत तिचे फॅन, स्टेजवर जाताच अलका कुबल यांना घट्ट मिठी मारली अन्…

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

‘इटाइम्स’च्या रिपोर्ट्सनुसार, या पर्वामध्ये खोट्या फॅन फॉलोइंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी सब्स्क्रीप्शन प्लॅन आणले आहेत. यासाठी पीआर सपोर्टदेखील काढून घेतला आहे. या कार्यक्रमामध्ये आधी नूपुर सेनन व अनुषा दांडेकर यांचे नाव आधीपासूनच चर्चेत होते. पण आता सूत्रांनी सांगितले की, “आम्ही तनुश्री, अहाना, त्रिशाला, भव्य तसेच इतर कलाकारांबरोबर बोलणे सुरु आहे”. पण त्याबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही”.

आणखी वाचा – वरुण धवनला मुलगी झाल्यानंतर अजूनही रुग्णालयामध्ये आहे बायको, आता कशी आहे परिस्थिती?, सासरे म्हणाले, “नताशा आता…”

तसेच सूत्रांनी पुढे सांगितले की, “यावेळी सब्स्क्रीप्शन असल्याने यावेळी हा शो अधिक मोठा होऊ शकतो. हे सर्व पैसे कामावण्यासाठी नसून खोटी फॅन फॉलोइंग कमी करणे हे आहे”. यावेळी सोशल मीडियावरील पेज साठी पैसे देता येणार नाहीत. यावेळी कार्यक्रमाची वेगळ्या पद्धतीने आखणी करण्यात आली असून प्रेक्षकदेखील खूप एंजॉय करु शकणार आहेत.  

Tags: big bossbig boss ott 3ott 3season 3
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Janhvi kapoor and Praniti Shinde Relation

लग्न झाल्यानंतर शिंदे कुटुंबियांशी जोडली जाणार जान्हवी कपूर?, प्रणिती शिंदे यांच्याच घरातील मुलाला करत आहे डेट, नक्की मुलगा कोण?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.