बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांच्या जोड्या एकत्र स्पॉट होताना दिसल्या की त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण येतं. काहीवेळा ही कलाकार मंडळी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली देतात तर कित्येकदा आपलं वैयक्तिक आयुष्य त्यांना जगासमोर मांडायचं नसतं म्हणून नातं लपवून ठेवतात. मात्र सोशल मीडियाचं जाळं इतकं मोठं आहे की, या कलाकारांच्या अफेअरच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात. अशीच सध्या अफेअरच्या चर्चांमुळे चर्चेत असलेली जोडी म्हणजे जान्हवी कपूर व शिखर पहारिया. (Janhvi kapoor and Praniti Shinde Relation)
गेल्या अनेक दिवसांपासून जान्हवी कपूर सुशीलकुमार शिंदे यांच्या थोरल्या मुलीचा मुलगा शिखर पहाडियाला डेट करत आहे. प्रत्यक्ष नसलं तरी अप्रत्यक्षपणे जान्हवीने शिखरबरोबरच्या नात्यात असल्याची कबुली दिली आहे. अनेक कार्यक्रमांध्ये जान्हवी व शिखर यांनी एकत्र हजेरी लावली आहे. नुकत्याच अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातही दोघांनी हजेरी लावली होती. या प्री-वेडिंग कार्यक्रमातील त्यांचा लूक व एकत्र स्पॉट होणं चांगलंच व्हायरल झालं होतं.
अशातच लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला असून सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे यांनी विजय पटकवला आहे. प्रणिती शिंदे यांच्या या विजयानंतर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्या नावाची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. राजकारणात या बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव नेमकं आलं तरी कसं असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. तर या दोघींचं नेमकं काय नातं याचा खुलासा आज आपण करणार आहोत.
जान्हवी डेट करत असलेला शिखर हा स्मृती शिंदे व संजय पहाडिया यांचा मुलगा आहे. स्मृती शिंदे यांची बहीण प्रणिती शिंदे आहे. मावशी खासदार झाल्यानंतर शिखरने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत सोलापुरकरांचे आभार मानले होते. त्यामुळं जान्हवी -शिखर यांचं लग्न झाल्यास जान्हवी आणि प्रणिती यांच्यात जवळचं नातं असणार आहे. प्रणिती या जान्हवीच्या मावस सासू असणार आहेत. जान्हवी व मावस सासू प्रणिती शिंदे यांचं हे खास नातं फार कमी जणांना ठाऊक असेल. जान्हवी व शिखर त्यांच्या नात्याचा गांभीर्याने विचार करत असून एकमेकांच्या कुटुंबाला वेळही देताना दिसत आहेत.