‘पारू’ या मालिकेत रंजक ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. सध्या आदित्य व पारू यांच्या लग्नाचं सत्य लपवण्यासाठी खटाटोप सुरु असलेला पाहायला मिळत आहे. तर आदित्य हे सत्य लपवल्यामुळे दडपणाखाली आहे. तर एकीकडे दिशा व दामिनी हे सत्य अहिल्यादेवींसमोर कसं येईल याची वाट पाहत असतात. अशातच मालिकेच्या समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांना धक्का दिला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, पारूला किर्लोस्करांच्या घरातून बाहेर काढलं आहे. इतकंच नव्हेतर तिला नोकरीवरूनही काढून टाकलं आहे. (paaru Serial Update)
अहिल्यादेवींचा पारूवरील रागही या प्रोमोमध्ये स्प्ष्ट पाहायला मिळत आहे. मात्र या रागामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. असं असलं तर प्रोमोवरुन या सगळ्याला दिशा कारणीभूत असल्याचं स्पष्ट होतं आहे. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, पारू आणि गणी बंगल्याच्या गार्डनमध्ये असतात, तेव्हा पारूने लावलेलं जास्वदींचे रोपटे तेथे काढून ठेवलेले असते. ते दाखवत गणी पारूला म्हणतो की, “हे बघ तुझ्या देवीआईने काय केलं”. ते पाहून पारू रडू लागते. आणि म्हणते, “माझ्या चुकीची शिक्षा या रोपाला का दिली?”.
तर दिशा लांबून पाहत असते. दिशा म्हणते की, “ड्रामाक्वीनला घरातून आणि नोकरीवरुन हकलून दिलं आहे, तरीसुद्धा मॅडमचा ड्रामा काही थांबत नाही”. त्यानंतर गणी व पारू दिशासमोर येतात. तेव्हा गणी दिशाला म्हणतो, “तुम्हीच उपटलं आहे ते रोपटं”. हे ऐकून दिशाही गणीवर आवाज चढवून म्हणते, “हो तोडलं मी ते रोपटं”. यावर गणी रागात म्हणतो, “लय वाईट बाई आहे ही”. हे ऐकल्यावर दिशा गणीच्या कानशिलात लगावते. यावर पारूचाही संताप होतो. आणि पारू दिशाला जाब विचारते की, “तुम्ही गणीला का मारलं?”, यावर दिशा पारूला शांत बसायला सांगते.
तेव्हा चिडून पारू दिशाला म्हणते की, “मलासुद्धा तुमच्या भाषेत उत्तर देता येतं”. हे सर्वकाही अहिल्यादेवी मागे उभ्या राहून पाहत असतात. आणि त्या पारूला आवाज देतात. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात अहिल्यादेवींच्या रागाला पारूला सामोरं जावं लागणार का?, पारूला नोकरीवरुन का काढून टाकलं असेल?, आदित्य व पारूच्या लग्नाचं सत्य अहिल्यादेवींसमोर येणार का?, दिशाची चूक असताना अहिल्यादेवी दिशाला पाठीशी घालत पारूला शिक्षा देणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.