सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या निवडणुका पाच टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या. यामध्ये आपल्याला मनोरंजन क्षेत्रातील अनेक चेहरे अनपेक्षितपणे निवडणुकांच्या रिंगणात पाहायला मिळाले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला देखील हिमाचल येथी मंडी या विभागातून भाजपाकडून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले होते. त्यानंतर ती अनेक ठिकाणी प्रचार करतानादेखील दिसून आली. आज (४जून) निवडणुकांचा निकाल हाती येत आहे. पण अजून अंतिम निकाल येण्यास बराच कालावधी बाकी आहे. दरम्यान हाती आलेल्या आतापर्यंतच्या माहितीनुसार हिमाचल येथील मंडी येथून कंगना सुमारे ५४ हजार मतांनी आघाडीवर आहे. यासाठी ती आता देवाची पूजा करताना दिसत आहे. (kangana ranaut viral video)
निवडणुकांचा निकाल हाती येत असतानाच कंगना आघाडीवर असल्याने घरात पूजा करताना दिसत आहे. गुलाबी रंगाची साडी नेसून ती दिवा-बत्ती करताना दिसत आहे. अगरबत्ती देवाला दाखवल्यानंतर ती स्टँडमध्ये लावत आहे आणि डाव्या हाताने घंटी वाजवतानादेखील दिसत आहे. नंतर ती शेअवती हात जोडूनही देवाला नमस्कार करत आहे. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिच्यावर टिका करण्यास सुरुवात केली. ते तिला हे सगळं कॅमेऱ्यासाठी करत असल्याचे म्हंटलं आहे. कंगनाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सांगितले की, डाव्या हाताने घंटी वाजवणे चुकीचे आहे. तसेच नक्की कोणत्या हाताने देवाची पूजा करायची हेदेखील ती विसरली.
#WATCH | Himachal Pradesh: BJP candidate from Mandi and actor Kangana Ranaut offers prayers at her residence.
— ANI (@ANI) June 4, 2024
As per the latest ECI trends, she is leading from the seat by a margin of 30,254 votes. Counting is underway.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/Bs9BTAK765
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. देवीच्या मंदिराबाहेर तिची आई तिला दही साखर भरवताना दिसत आहे. त्यावर कंगनाने लिहिले की, “आईचा आशिर्वाद”, तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये तिची आई कंगनाच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “आई देवाचा अवतार आहे”.
कंगना मंडीमधून कॉँग्रेस नेता विक्रमादित्य सिंहच्या विरोधात उभी आहे. आता या दोघांमध्ये नक्की कोणाचा विजय होतो हे आता पाहाण्यासारखे आहे. जर ती निवडणूक जिंकली तर कायमचा बॉलिवूडला रामराम करणार असं या आधी कंगनाने स्पष्ट केले आहे.