रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य कल्पनासमोर?, नातवंडांचं स्वप्न राहणार का अपूर्ण?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 4, 2024 | 11:28 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, कल्पना प्रतापबरोबर बोलताना अर्जुन व सायलीच्या बाळाच्या तयारीला सुरुवात करण्याबाबत बोलत असते. पण प्रताप कल्पनाला त्यांनी आपल्याला काही सांगितल्याशिवाय तू स्वतः काही ठरवू नकोस असं सांगतो. पण कल्पनाला मात्र आजी होण्याची आस लागलेली असते. कल्पना न राहवून सायलीला अर्जुन कोणत्या सेकंड इनिंग बद्दल बोलत होता असाही प्रश्न विचारते. त्यावर सायली मधुभाऊंच्या केसबद्दल बोलत असल्याचं सांगते. सायली आणि अर्जुन सेकंड इंनिंग म्हणजे केसबाबत बोलत असतात मात्र कल्पना स्वतःचा गैरसमज करुन घेते. (Tharal Tar Mag Serial Update)

नातवंडांचे वेध लागल्याने कल्पना सायलीला आपल्या रूममध्ये बोलावून तिला अर्जुनच्या लहानपणीचे कपडे आणि फोटो दाखवते. तेव्हा सायलीच्या लक्षात येत की, कल्पना आजी होण्याची स्वप्न पाहत आहे. सायलीला या स्वप्नाचं फार दडपण येतं. तर एकीकडे अर्जुनचा गोड फोटो पाहून ती खूप खुश होते. सायलीला खुश पाहून कल्पना त्याचा वेगळा अर्थ काढते. लवकरच आपल्या घरात पाळणा हलणार असं तिला सारखं वाटत असतं.

आणखी वाचा – अप्पी-अर्जुनला एकत्र आणण्यासाठी अमोलचे प्रयत्न सुरु?, दोघांना एका खोलीत बंदही केलं आणि…; सिंबाची इच्छा होणार का पूर्ण?

दुसरीकडे रविराज कोर्टात झालेल्या प्रकाराचा विचार करत असतो. तेव्हा तिथे प्रिया व नागराज असतात. साक्षी खोटारडी आहे हे मला माहीत होतं पण आता विलासचा खून तिनेच केला आहे. असा मला दाट संशय वाटत असल्याचं प्रियाला सांगतो. शिवाय विलासचा खून झाला तेव्हा तू एकमेव आयविटनेस होतीस त्यामुळे तू तिथे काय पाहिलं आहेस ते तुला आठवतं आहे का?, असं प्रियाला विचारतो. मात्र प्रिया काहीच आठवत नसल्याचं सांगत दुर्लक्ष करते.

आणखी वाचा – पारू-आदित्यच्या लग्नाचं सत्य अहिल्यादेवींसमोर येणार?, दिशा-दामिनीचा नवा डाव ठरणार का यशस्वी?, मालिकेत रंजक ट्विस्ट

तर इकडे साक्षी महिपतला जाऊन जेलमध्ये भेटते. कोर्टात आपण तोंडावर पडलो हे जेव्हा ती महिपतला सांगते तेव्हा तो तिच्यावर भडकतो. हे सर्व चैतन्यने केलं का असा त्याला संशय येतो. पण साक्षी नाही असं म्हणत त्याने उत्तम प्रकारे माझी बाजू मांडली असं सांगते. साक्षी म्हणते माझ्या फोनला आय लॉक आहे. त्यामुळे चैतन्य माझा फोन उघडूच शकत नाही.‌यावर महिपत सांगतो की तू लवकरात लवकर मला इथून बाहेर काढ. आता मालिकेच्या पुढील भागात सायली व अर्जुन व्हिडीओ कॉलवर बोलत असतात, तेव्हा सायली कल्पनाला नातवाची आस लागली असल्याचं सांगते. तितक्यात तिथे कल्पना येते तर अर्जुन आईला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल समजलं का असं विचारतो, आता हे कल्पनाने ऐकलं असेल का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada Promo

अखेर अक्षराने अधिपतीला म्हटलं आय लव्ह यु, दोघांमध्ये बहरणार प्रेम, पण भुवनेश्वरी नवा डाव खेळणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.