शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Emergency Movie Trailer : कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित, इंदिरा गांधींच्या लूकमध्ये पाहून प्रेक्षकही थक्क

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 14, 2024 | 5:43 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
कंगना रणौच्या ''इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

कंगना रणौच्या ''इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Emrgency Movie Trailer : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. तिच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. अभिनयाबरोबरच तिने काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहेत. अशातच तिने आता मनोरंजन क्षेत्र सोडून राजकारणात प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेश येथील मंडी या भागातून ती निवडून आली. त्यानंतर चंदीगढ एअरपोर्टवर एका महिला कॉन्स्टेबलने तिच्या कानाखाली मारल्यानेही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.मात्र तिचा एक बहुचर्चित चित्रपट ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे.  

आज स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला कंगनाच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. यामध्ये कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लूकमध्ये दिसून येत आहे. काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कंगनाच्या अभिनयाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटामध्ये १९७५ साली लावण्यात आलेल्या आणीबाणीबद्दलचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांवर सोढीचे फसवणूकीचे आरोप, अभिनेत्याच्या आई-वडिलांनाही बसला धक्का, म्हणाला, “माझी भूमिका…”

या ट्रेलरमध्ये कंगनाचे हावभाव इंदिरा यांच्यासारखेच असलेले दिसून येत आहेत. हे बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या चित्रपटामध्ये आणीबाणीच्या वेळी नक्की काय परिस्थिती होती हे दाखवण्यात आले आहे. यामध्ये इंदिरा यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला. तसेच यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांच्या कार्यकाळात युद्ध परिस्थिती असतानादेखील कसे मार्ग काढले याबद्दल दाखवण्यात आले आहे.

आणखी वाचा – वर्षा उसगांवकरांनी Bigg Boss Marathi मध्ये दिलेली वागणूक पुरुषोत्तमदादा पाटील यांना खटकली, म्हणाले, “त्यांची विचारण्याची पद्धत…”

या चित्रपटामध्ये कंगना व्यतिरिक्त श्रेयस तळपदे, सतीश कौशिक, महिमा चौधरी, अनुपम खेर व मिलिंद सोमण हे कलाकारदेखील दिसणार आहेत. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील कंगनाने केलं आहे. हा चित्रपट आता बॉक्सऑफिसवर काय कमाल करणार हे आता पाहण्यासारखे आहे.

Tags: emergencykangana ranautmoviemovie trailor launch
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 contestant fight

Video : डीपीने निक्कीला पकडलं, सूरज अंगावर धावून गेला अन्…; Bigg Boss च्या घरात मोठी हाणामारी, माणूसकी हरवली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.