शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांवर सोढीचे फसवणूकीचे आरोप, अभिनेत्याच्या आई-वडिलांनाही बसला धक्का, म्हणाला, “माझी भूमिका…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 14, 2024 | 4:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
gurucharan singh on producers

गुरुचरण सिंह यांनी 'तारक मेहता...'मालिकेच्या निर्मात्यांवर केले आरोप

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका अधिक लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. यातील एक महत्त्वाची भूमिका म्हणजे मी.सोढी ही आहे. ही भूमिका अभिनेता गुरुचरण सिंहने साकारली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी गुरुचरण अधिक चर्चेत आले होते. ते त्यांच्या राहत्या घरातून २५ दिवस बेपत्ता झाले होते. मात्र ते नक्की कुठे गेले, कुठे राहिले याबद्दल कोणालाही काहिही माहिती नव्हती. ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्या वडिलांनी याबद्दल माहिती दिली. (gurucharan singh on producers)

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार गुरुचरण पुन्हा एकदा मालिकेमध्ये दिसतील अशा चर्चा सुरु होत्या. मात्र निर्माते असित मोदी यांनी स्वतः खुलासा करत असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. मालिका सुरु झाल्यापासूनच गुरुचरण यामध्ये भूमिका साकारत होते. मात्र २०१२ साली त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. कॉन्ट्रॅक्टबद्दल काहीही बोलणं न करता निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असे अभिनेत्याने बोलताना सांगितले.  

आणखी वाचा – महादेवांना म्हणतो पप्पा तर मरीमातेला आई, Bigg Boss च्या घरातील खरा सूरज नक्की कसा?, पुरुषोत्तम म्हणाले, “तो चिडतो पण…”

View this post on Instagram

A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)

गुरुचरण यांनी सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सर्व प्रसंगाबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, “ ‘तारक मेहता…’ या मालिकेतील सर्व टीम ही माझ्या कुटुंबासारखी होती. त्यावेळी मालिकेतील कॉन्ट्रॅक्ट व करार यासंदर्भात चर्चा सुरु होती. माझी भूमिका दुसरा अभिनेता साकारणार आहे याबद्दल मला काहीही सांगितलं नव्हतं. मी तेव्हा दिल्लीमध्ये माझ्या कुटुंबीयांबरोबर होतो”.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada : अधिपतीच्या खऱ्या आईचा घरात प्रवेश, तर चारूहास त्याचवेळी आत्महत्या करण्यास गेले अन्…; भूवनेश्वरीची खेळी की आणखी काही?

पुढे त्यांनी सांगितलं, “त्यावेळी धर्मेंद्रजी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मालिकेत आले होते. त्यावेळी नवीन सोढीची एंट्री पाहायला मिळाली होती. मी जेव्हा ते सगळं पाहिलं तेव्हा मला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी माझ्या आई-वडिलांनादेखील धक्का बसला होता. माझे दर्शकदेखील खूप निराश झाले होते. तसेच अनेक जण मालिका का सोडली? असंदेखील सगळेजण विचारु लागले होते”. दरम्यान आता मालिकेचे निर्माते यावर कोणती प्रतिक्रिया देतात हे आता पाहण्यासारखे आहे.

Tags: gurucharan singhroletaarak Mehta ka oolta chashma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Varsha Usgaonkar behavior offended to Purushottamdada Patil know the reason

वर्षा उसगांवकरांनी Bigg Boss Marathi मध्ये दिलेली वागणूक पुरुषोत्तमदादा पाटील यांना खटकली, म्हणाले, "त्यांची विचारण्याची पद्धत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.