सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हैद्राबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये भुताटकी, काजोलचा मोठा दावा, म्हणाली, “देवाच्या कृपेने मला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 19, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kajol calls ramoji film city haunted

हैद्राबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये भुताटकी, काजोलचा मोठा दावा, म्हणाली, “देवाच्या कृपेने मला...”

प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार मंडळी बरीच धडपड करत असतात. सेटवर १२ ते १३ तास काम करतात. इतके तास सेटवर असल्यानंतर तेथील जागा आणि वास्तूशी त्यांची एक वेगळीच नाळ जोडली जाते. प्रत्येक सेटचा अनुभवही कलाकारांना येतो. काही वास्तू सकारात्मक वाटतात. तर काही कलाकारांना नकारात्मकताही जाणवते. असंच काहीसं सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोलबाबतही घडलं आहे. बरीच वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर तिने याबाबत भाष्य केलं. काजोलने सेटवरचा अनुभव शेअर करत नकारात्मक गोष्टींविषयी उघडपणे सांगितलं. (kajol calls ramoji film city haunted)

रामोजी फिल्म सिटीमध्ये काही सेटवर शूट करत असताना काजोलला विचित्र अनुभव आले. याचबाबत तिने स्पष्ट सांगितलं. जिवंत परत आली ही देवाची कृपा असंही काजोल यावेळी म्हणाली. रामोजी फिल्म सिटीमध्ये भुताटकी असल्याचं काजोलचं म्हणणं आहे. तिला पुन्हा तिथे शूट करण्याचीही इच्छा नाही. असं काजोलनेच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

आणखी वाचा – “फक्त प्रसिद्धी व नाव हवंय आणि…”, चर्चेत राहण्यासाठी गोविंदाच्या पत्नीची धडपड, म्हणाली, “आडनाव काढलं कारण…”

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोल म्हणाली, “तिथे चित्रीकरण म्हणजे भयंकर. रात्री शूट झाल्यानंतर कुठे झोपायचं? हेही आम्हाला तेव्हा माहित नसायचं. तिथून बाहेर जरी पडलो तरी पुन्हा कामासाठी त्याच जागी येऊ नये हिच प्रार्थना होती. तिथे खूप अशा जागा आहेत. त्याची काही उदाहरणंही आमच्याकडे आहेत. रामोजी राव फिल्मसिटी जगातील भयावह जागांपैकी एक आहे”.

आणखी वाचा – सात दिवसानंतर संजय कपूर यांच्यावर होणार अंत्यसंस्कार, पूर्वाश्रमीच्या पतीच्या अंतिम दर्शनाला करिष्मा कपूर दोन्ही मुलांसह रवाना

“रामोजी राव फिल्मसिटीमध्ये भुताटकी आहे. तिथे काम करत असताना देवाने मला वाचवलं. माझ्या नशिबाने मला तिथे वेगळं काही दिसलं नाही”. रामोजी फिल्म सिटीमध्ये काजोलने बऱ्याच चित्रपटांचं शूट केलं. या फिल्मसिटीमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट घडले. बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचं चित्रीकरणही इथे होतं. इतकंच काय तर अजय देवगणनेही इथे अनेक चित्रपटांचं चित्रीकरण केलं आहे.

Tags: bollywood newsentertainment newskajol
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
Next Post
Hina Khan Shares Video

जोडीदार असावा तर असा! कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर नवरा हिना खानची अशी घेत आहे काळजी, पायाला मसाज अन् जेवणाकडेही लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.