गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जोडीदार असावा तर असा! कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर नवरा हिना खानची अशी घेत आहे काळजी, पायाला मसाज अन् जेवणाकडेही लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 19, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hina Khan Shares Video

जोडीदार असावा तर असा! कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर नवरा हिना खानची अशी घेत आहे काळजी, पायाला मसाज अन् जेवणाकडेही लक्ष

Hina Khan Shares Video : हिना खान सध्या रॉकी जयस्वालबरोबर तिच्या विवाहित आयुष्याचा आनंद घेत आहे. नुकताच तिने एक रॉकीचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अभिनेत्रीच्या पायांची मालिश करताना दिसला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘हिना खानने फूल देणारा नाही तर, फुलासारखा जपणारा मिळाला आहे’ असं कॅप्शन दिलं आहे. हिनाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे आणि हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी रॉकी जयस्वालचे कौतुक केला आहे. हिनाने हा व्हिडीओ स्वत:च बनविला आहे, तर रॉकीचे संपूर्ण लक्ष तिच्या पायाच्या मालिशवर आहे. कॅन्सर उपचारादरम्यानही रॉकी हिनाची बरीच सेवा करताना दिसला.

दु: खाच्या प्रत्येक क्षणी रॉकी जयस्वाल हिना खानची सेवा करताना दिसला आणि त्याला पाहून चाहत्यांची मने त्याने जिंकली. हिना आणि रॉकी सुमारे १३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आता त्यांनी अखेर लग्न केले आहे. हिना खानला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर मग हिना खानला कर्करोगाने ग्रासले. परंतु रॉकी जयस्वालने तिला आणि तिच्या कुटुंबाला कधीही दूर केले नाही. रॉकी, हिनाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढाईत धैर्य म्हणून उभा राहिला आणि त्याने तिची खूप काळजी घेतली.

आणखी वाचा – Video : वडिलांचं पार्थिव पाहताच ढसाढसा रडू लागली मन्नारा चोप्रा, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

तो अजूनही हिना खानची काळजी घेत आहे. हिना खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आणि सांगितले की, ही तिचा पती रॉकी जयस्वालची रोजची दिनचर्या आहे. तो दररोज तिच्या पायांची मालिश करतो. कर्करोगाच्या उपचारादरम्यान, रॉकी हिनाच्या औषधांची, खाण्यापिण्याची काळजी घेत असे. तो तिच्या डोक्याला तेल लावून मालिश करत असे आणि कधीकधी तिचे पायही दाबत असे.

आणखी वाचा – सात दिवसानंतर संजय कपूर यांच्यावर होणार अंत्यसंस्कार, पूर्वाश्रमीच्या पतीच्या अंतिम दर्शनाला करिष्मा कपूर दोन्ही मुलांसह रवाना

हिनाने व्हिडीओ शेअर करत लिहिले, “कदाचित वरच्याने शरीराला दुखापत केली, पण आत्म्याला शांती दिली. त्याची रोजची दिनचर्या. आम्ही ठीक आहोत, होय लवकरच. मुकम्मल शिफा इंशाल्लाह”. हिना खानचा व्हिडीओ पाहून, चाहते म्हणत आहेत की, तिने गेल्या जन्मामध्ये काही पुण्य केले असावे, ज्याला तिला रॉकी जयस्वालसारखा पती मिळाला. “तुमच्यात किती प्रेम आहे. कधीकधी मला भीती वाटते की कोणाला हे पाहवलं नाहीतर. देवा या दोघांना वाईट डोळ्यांपासून दूर ठेवा”. तर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं, “तुम्हाला रॉकी सारखा जोडीदार मिळाला आहे, तुम्ही या जगातील सर्वात आनंदी मुलगी आहात”.

Tags: emotional videohina khantelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Karisma -Sunjay Arrange Marriage

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं झालेलं अरेंज-मॅरेज, लग्नाबाबत अभिनेत्री म्हणालेली, "माझ्या आई-वडिलांचा निर्णय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.