अभिनेत्री जया बच्चन या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ८०-९० च्या दशकामध्ये त्यांनी अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षीदेखील त्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. मात्र अभिनयाबरोरबच त्या राजकारणातही तितक्याच सक्रिय आहेत. २००४ सलाई त्यांनी पहिल्यांदा समाजवादी पार्टीमधून संसद सदस्या म्हणून निवड झाली. घर, काम व राजकारण अशा सगळ्याच बाजू व्यवस्थित सांभाळल्या. जया याबरोबरच त्यांच्या रोखठोक विधानांमुळेही त्या चर्चेत येतात. अशातच आता त्यांच्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. (jaya bachchan on budget 2024)
जया या नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. नेहमी त्यांचे विचार स्पष्टपणे मांडताना दिसतात. आता नुकतेच त्यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. २४ जुलै २०२४ रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यानंतर जया यांनी मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या की, “केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ बद्दल काहीही बोलायचे नाही. कारण या विषयावर बोलण्यात काहीही अर्थ नाही. हे केवळ एक नाटक आहे जे फक्त कागदावरच राहील प्रत्यक्षात काहीही येणार नाही”.
पुढे त्या म्हणाल्या की, “सध्याच्या अर्थसंकल्पात चित्रपटसृष्टीसाठी काहीही तरतूद करण्यात आली नाही. तसेच यामुळे कलाकारांना फायदा झाला ना या क्षेत्राला फायदा झाला. आमच्यासाठी काहीही केले नाही. आमच्या क्षेत्रासाठी काहीही नाही. देशासाठी आम्ही काहीही नाही”.
आणखी वाचा – ऐश्वर्या व अभिषेक घेणार ग्रे घटस्फोट?, हे नवीन प्रकरण आहे तरी काय?, सत्य आलं समोर
जया सध्या कामबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबातील तणावामुळे अधिक चर्चेत आली आहे. मुलगा अभिषेक बच्चन व सून ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आल्याचे अंदाज बांधले जात आहेत. राधिका व अनंत अंबानी यांच्या लग्नामध्ये कुटुंबामध्ये आलेला दुरावा दिसून आला आहे. यावेळी अमिताभ बच्चन, जया, अभिषेक व मुलगी श्वेता बच्चन हे एकत्रित आले होते. तसेच ऐश्वर्या ही मुलगी आराध्याबरोबर लग्नासाठी उपस्थित राहिली होती. त्यामुळे आता ऐश्वर्या व बच्चन कुटुंब वेगळे होणार याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.