अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा करत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचा खुलासा केला. घटस्फोटाची माहिती हार्दिकने सोशल मीडियावर शेअर केली होती. घटस्फोटानंतर नताशा तिच्या गावी सर्बियामध्ये तिच्या लेकाला घेऊन गेली आहे. या दरम्यान, ती मुलगा अगस्त्यबरोबर फिरायला बाहेर पडली आहे. सध्या नताशा अगस्त्यबरोबर क्वालिटी टाइम शेअर करताना दिसत आहे. नताशाने २४ जुलै रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ व फोटो शेअर केले होती. यामध्ये अभिनेत्री तिच्या मुलासह अगस्त्यबरोबर एन्जॉय करताना दिसत आहे. (Natasa Stankovic Shares Photo)
हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा तिचा मुलगा अगस्त्यासह चांगला वेळ घालवताना दिसली. नताशा तिच्या मुलासह प्राणीसंग्रहालयात फिरायला गेली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फोटो पोस्ट केले आहेत. तिने पोस्टच्या कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीही शेअर केला आहे. या फोटोंना नेटकरी भरभरुन पसंती देत आहेत.
अभिनेत्रीने तिथे फिरतानाचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. हार्दिक पांड्या देखील नताशाच्या पोस्टवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही आहे. भारतीय क्रिकेटपटूने एक नाही तर दोन कमेंट्स बायकोच्या या पोस्टवर केल्या आहेत. हार्दिक पांड्याने हार्ट इमोजीसह नजर न लागण्याचे चिन्ह शेअर करत कमेंट केली आहे. तर त्यांची एक कमेंट हार्ट इमोजीची आहे. उल्लेखनीय बाब अशी आहे की, हार्दिक व नताशा मिळून त्यांचा मुलगा अगस्त्य पांड्याला वाढवणार असल्याचं त्यांनी ठरवलं आहे.
आणखी वाचा – अहिल्यादेवींचा राग अनावर, पारूला विचारला जाब, खरं सत्य काय हे पारू सांगणार का?
समोर आलेल्या काही फोटोंमध्ये नताशा स्टॅनकोविक तिच्या मुलाबरोबर पोज देत आहे तर काही फोटोंमध्ये ती वेगळी दिसत आहे. नताशा व हार्दिकने २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात गुपचूप लग्न केले होते. नंतर दोघांनीही मोठ्या थाटात लग्न केले. मात्र आता दोघेही चार वर्षांनंतर वेगळे झाले आहेत.