अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांमधील दुराव्याच्या बातम्यांना सातत्याने नवे वळण मिळताना पाहायला मिळत आहे. नुकतेच, अनंत अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या राय व आराध्या स्वतंत्रपणे पोहोचल्या होत्या आणि बच्चन कुटुंबातील बाकीची सर्व मंडळी एकत्र आली होती, तेव्हा या दोन्ही कुटुंबातील मतभेदाच्या बातम्यांनी जोर धरला. आता दोघेही ग्रे घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे. (Abhishek Bachchan And Aishwarya Rai Bachchan)
गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. एकामागोमाग एक गोष्टी समोर येत असल्याने त्यांच्यात काही बरोबर नसल्याचे स्पष्ट होत आहे. काही काळापूर्वी अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाईक केली होती, ज्यामुळे या प्रकरणालाही उधाण आले होते. अभिषेकने लाईक केलेली ही पोस्ट ग्रे घटस्फोटाशी संबंधित होते, ज्यामध्ये हार्ट ब्रेक झाल्याचा फोटो बनविला गेला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “घटस्फोट कोणासाठीही सोपे नाही”. त्यामुळे अभिषेक व ऐश्वर्या ग्रे घटस्फोट घेणार की काय अशा चर्चा आहेत.
आणखी वाचा – अहिल्यादेवींचा राग अनावर, पारूला विचारला जाब, खरं सत्य काय हे पारू सांगणार का?
ग्रे-डिव्होर्सबाबत अभिषेकची पोस्ट लाईक केल्यानंतर ग्रे-डिव्होर्स म्हणजे काय याची चर्चा सुरु आहे. विवाहित जोडप्यांमध्ये काही ठीक होत नसेल तर त्यांचा घटस्फोट होतो. अनेकवेळा लग्नानंतर ५-१० वर्षे एकत्र राहूनही काही घडत नाही, मग लोकांचा घटस्फोट होतो. पण हल्ली वृद्धापकाळातही घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत. हा ट्रेंड पाश्चिमात्य देशांत जास्त असला तरी आता भारतातही तो हळूहळू वाढत आहे.
ग्रे-घटस्फोट म्हणजे जेव्हा लोक लग्नाच्या अनेक वर्षांनी म्हणजेच ४०-५० वर्षांनंतर घटस्फोट घेतात. बराच काळ एकत्र घालवल्यानंतर हे जोडपे एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. लग्नाच्या इतक्या वर्षांनी मुलंही मोठी व शहाणी होतात. मात्र, इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतर जोडीदारापासून वेगळे होणे सोपे नाही.
ग्रे-घटस्फोटाला सिल्व्हर स्प्लिटर किंवा डायमंड घटस्फोट असेही म्हणतात. ग्रे घटस्फोट मुख्यत्वे भारतात जरी ते नवीन असले तरी पाश्चिमात्य देशांमध्ये ते खूप वेगाने पसरले आहे.