सिनेसृष्टीतील बरीच अशी कलाकार मंडळी आहेत जी त्यांच्या चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत कुटुंबासह वेळ घालवताना दिसतात. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या कटुंबाबरोबरही क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. अशातच एक मराठमोळा अभिनेता जो नेहमीच चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळ काढत त्याच्या बायको, व आई-वडिलांसह वेळ घालवताना दिसतो. हा अभिनेता म्हणजे रोहन गुजर. नाटक, मालिका व चित्रपट या सर्वच माध्यमांमधून आपला अभिनयाचा डंका वाजवत रोहनने प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकाविश्वात विविधांगी भूमिका साकारल्यामुळे रोहन नेहमीच चर्चेत असलेला पाहायला मिळाला आहे. (Rohan Gujar Foreign Trip)
‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय व गाजलेल्या मालिकेत रोहनने साकारलेल्या पिंट्याही भूमिका साऱ्यांच्या पसंतीस उतरली. या भूमिकेमुळे रोहनला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या ‘नवी जन्मेन मी’ या ‘सन मराठी’ वाहिनीवरील मालिकेत तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. मालिकेबरोबरचा सोशल मीडियावरही रोहन बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.
आणखी वाचा – ऐश्वर्या व अभिषेक घेणार ग्रे घटस्फोट?, हे नवीन प्रकरण आहे तरी काय?, सत्य आलं समोर
विशेषतः रोहन सोशल मीडियावरुन नेहमीच त्यांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत असतो. मालिकेबरोबर रोहन रंगभूमीही गाजवताना दिसतो. अशातच मालिकेच्या चित्रीकरणातून ब्रेक घेत सध्या रोहन परदेशवारी करण्यात रमला आहे. रोहन यावेळी कुटुंबाबरोबर दुबई येथे फिरताना दिसत आहे. आई-वडील व बायको यांना घेऊन सध्या रोहन दुबई दौरा करताना दिसत आहे.
“कुटुंब – पहिला परदेश दौरा”, असं कॅप्शन देत रोहनने दुबई दौऱ्याचे अनेक फोटो त्याच्या इस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रोहन त्याच्या कुटुंबासह दुबई एक्स्प्लोर करताना दिसत आहे. दुबई येथे फिरतानाचे अनेक फोटो त्याने शेअर केले आहेत. पहिल्यांदाच आई-बाबांसह परदेशवारी करतानाचा आनंद रोहनच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत आहे.