बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध कवी होते. हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या ‘इन द आफ्टरनून ऑफ टाइम’ या आत्मचरित्रात मुलगा अमिताभ बच्चन यांच्या लग्नाशी संबंधित अनेक न ऐकलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत. बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक असलेल्या अमिताभ व जया यांच्या लग्नाला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. अशातच त्यांच्या वैवाहिक जीवनाशी निगडीत एक घटना चांगलीच व्हायरल होत आहे. (Jaya Bachchan Father Statement)
वृत्तवाहिनींद्वारे प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अमिताभ बच्चन यांच्या लग्नाचा उल्लेख करताना लिहिले आहे की, अभिनेत्याचे लग्न एक जिव्हाळ्याचा कार्यक्रम होता. काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत या जोडप्याने लग्नगाठ बांधली.अमिताभ-जया यांचे लग्न या जोडप्याच्या जवळच्या मित्राच्या घराच्या गच्चीवर झाले होते. त्यांच्या लग्नाला केवळ पाच पाहुणे उपस्थित होते, त्यापैकी एक अभिनेत्याचे वडील स्वतः होते आणि दुसरे राजकारणी संजय गांधी होते.
हरिवंशराय बच्चन पुस्तकात लिहितात की, त्यांची सून जया बच्चन यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती की लग्न बंगाली रितीरिवाजांनुसार व्हावे, ज्याला त्यांचा कोणताही आक्षेप नव्हता. त्यांनी पुस्तकात असेही सांगितले आहे की, संपूर्ण लग्नाच्या काळात वधूशिवाय जया बच्चन यांच्या कुटुंबातील कोणीही आनंदी नव्हते. लग्नाच्या विधीदरम्यानही वधूच्या कुटुंबात उत्साह नव्हता. सर्व कार्यक्रम अतिशय लहान पातळीवर आयोजित करण्यात आल्याने अमिताभ यांची आई तेजी बच्चन खूप निराश झाल्या. तिला आपल्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे होते, पण ते होऊ शकले नाही. अगदी शेजाऱ्यांनाही लग्नाची माहिती दिली नाही.
हरिवंशराय बच्चन यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना त्यांच्या घरातील सजावटीबद्दल विचारले असता त्यावेळी त्यांनी खोटेपणाचा अवलंब करुन हे प्रकरण टाळले होते. त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना सांगितले होते की, घरात अमिताभ यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे, त्यामुळे संपूर्ण घर सजले आहे. आपल्या मुलाच्या लग्नाबद्दल लिहिताना त्यांनी पुस्तकात आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. त्यांनी असेही लिहिलं आहे की, लग्नानंतर, जेव्हाही ते त्यांच्या व्याहीना (जया बच्चनचे वडील) लग्नाचे अभिनंदन करण्यासाठी मिठी मारायला गेले, तेव्हा त्यांनी त्यांना खूप कटू गोष्टी सांगितल्या. “माझे कुटुंब कायमचे उद्ध्वस्त झाले”, असेदेखील त्यांनी हरिवंशराय बच्चन यांना सांगितले.