ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपं आहेत. दोघांना आराध्या नावाची मुलगीदेखील आहे. सध्या ऐश्वर्या व अभिषेक यांच्यातील मतभेदाच्या बातम्या खूपच चर्चेत आहेत. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात दोघेही वेगवेगळे पोहोचले, त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांच्या चर्चांनी खूपच जोर धरला. यानंतर अभिषेकने घटस्फोटाची पोस्टही लाईक केली. त्यामुळे हे दोघे त्यांच्या नात्याबद्दल खूपच चर्चेत आहेत. या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या आणि अभिषेकच्या नात्याबद्दल खुलासे करताना दिसत आहे.
‘फिल्मफेअर’च्या मुलाखतीदरम्यानचा ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ऐश्वर्या तिच्या व अभिषेक नात्याबद्दल बोलली आहे. या मुलाखतीत तिला अभिषेकबद्दल विचारण्यात आले. याबद्दल बोलण्यासाठी ऐश्वर्या सुरुवातीला कचरत होती. नंतर तिने असं म्हटलं की, “त्यांचा वाद हा वैयक्तिक विषय आहे. कोणालाही याबद्दल जाणून घ्यायचे नाही”.
यापुढे पुढे तिने दोघांना एक जोडपे म्हणून ज्या आव्हानांचा सामना करावा लागला त्याबद्दलही सांगितले. यावेळी ऐश्वर्या असं म्हणाली होती की, “आम्ही दोघेही खूप खंबीर, मतप्रिय व्यक्तिमत्त्व आहोत आणि वाद घालणे आणि चर्चा करणे यातला फरक आम्ही अजूनही शिकत आहोत. वाद घालणे आणि चर्चा करणे यात एक पुसटशी ओळ आहे आणि ती ओळ काय आहे हे आम्ही अजूनही शोधत आहोत”.
आणखी वाचा – “‘धर्मवीर-२’मध्ये एकनाथ शिंदेंचा हस्तक्षेप नाही”, क्षितीश दातेचं वक्तव्य, म्हणाला, “त्यांचे सल्ले…”
यापुढे ऐश्वर्याने असं म्हटलं होतं की, “माझ्या आणि अभिषेकच्या विचारात खूप फरक आहे. आम्ही अनेक गोष्टींवर वाद घालतो. पण अभिषेक सर्वात जास्त वाद घालतो आणि मला हे अजिबात आवडत नाही. जेव्हा तो वाद घालतो, तेव्हा ते मला भांडणासारखे वाटते”.
दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ते लग्नबंधनात अडकले. अभिषेक-ऐश्वर्या २००७ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर २०११ मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला