बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या खूप चर्चेत आहे. जान्हवीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या. नुकतीच ती ज्युनिअर एनटीआरबरोबर ‘देवरा’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. गेल्या काही वर्षांपासून जान्हवी व शिखर पहाडिया यांच्या अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. लवकरच दोघंही लग्नबंधनात अडकतील अशा चर्चादेखील सर्वत्र सुरु आहेत. दोघांनी त्यांचं नातं सर्वांसमक्ष स्वीकारले आहे. दरवर्षी ती शिखरबरोबर आई श्रीदेवीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिरूपती मंदिरात जाऊन दर्शनदेखील घेताना दिसते. अशातच आता जान्हवीचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. (janhvi kapoor bridal look)
समोर आलेल्या फोटोमध्ये जान्हवी व शिखर एकमेकांचा हात पकडलेले दिसून येत आहेत. या फोटोंमध्ये दोघांचेही प्रेम दिसून येत आहे. हे पाहून नेटकऱ्यांनीदेखील खूप पसंती दर्शवली आहे. तसेच जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केले आहेत त्यामुळे सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जाणून घेऊया या फोटोंमध्ये असे काय आहे ते. दरम्यान शेअर केलेल्या फोटोंमध्ये जान्हवी लग्नाच्या लाल लेहंग्यामध्ये दिसून येत आहे. तिला या लूकमध्ये बघून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जान्हवीला लहंग्यामध्ये पाहून तिने लग्न केलं की काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र असे नसून तिने हे कपडे एका जाहिरातीसाठी परिधान केले होते. तिचे हे ब्राइडल फोटोशूट असून एका प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रॅंडसाठी करण्यात आले आहे. मात्र तिचे फोटो समोर आल्यानंतर खऱ्या आयुष्यात कधी नवरी होणार? असा प्रश्न तिला विचारत आहेत.
तसेच जान्हवीच्या एका फोटोवर तिच्या चाहत्यांच्या तसेच नेटकऱ्यांच्या नजरा खेळल्या आहेत. या व्हायरल फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या पाळीव श्वानाबरोबर दिसत आहे. तसेच शिखर जान्हवीच्या केसात हात फिरवतानाही दिसत आहे. यामुळे दोघांमध्ये असलेले प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान आता हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.