टेलिव्हिजन तसेच चित्रपटसृष्टीतील अन्नू कपूर हे अधिक प्रसिद्ध आहे. ते त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्यांच्या अभिनयापेक्षा इतर काही करणांमुळे अधिक चर्चेत असतात. अशातच त्यांची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये त्यांनी भगवद् गीता व इस्लाम धर्माकडून काय शिकावं? याबद्दल सांगताना दिसत आहे. गीता खूप सुंदर ग्रंथ आहेच पण हिंदू लोकांची इस्लामकडून नक्की काय शिकलं पाहिजे? याबद्दल ते सांगताना दिसत आहेत. त्यामुळे अन्नू खूप चर्चेट आले आहेत. ते नक्की काय म्हणाले? याबद्दल आपण जाणून घेऊया. (annu kapoor on islam)
अन्नू यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रीमद् भगवत गीताबद्दल सांगितले की, “गीता खूप चांगला ग्रंथ आहे, मी नास्तिक असूनही हे सगळं बोलत आहे. जे काही शिकायचं असेल ते सगळं गीतेमध्ये शिकायला मिळेल. शत्रूंनी चहू बाजुंनी देशाला घेरलं आहे. आपण खूप कोमल मनाचे आहोत त्यामुळे आपल्याला सगळ्यांनीच धोका दिला आहे. पण जर कोणी आपल्या देशाला नुकसान पोहोचवत असेल तर त्यावर आपण उत्तर दिले पाहिजे”.
यानंतर अन्नू यांनी इस्लाम धर्माविषयीदेखील भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “हिंदू लोकांनी इस्लाम धर्माकडून शिकवण घ्यावी”. यानंतर त्यांनी इस्लाम धर्मातील पाच पुस्तकांची नावंदेखील घेतली. तसेच त्यामधून काय काय शिकता येईल? हेदेखील त्यांनी सांगितले. काय करावं? काय करु नये? याबद्दल माहिती असले तर आयुष्याला योग्य दिशा मिळते. तसेच एकत्रितपणाची भावनादेखील येते असेही ते म्हणाले.
दरम्यान अन्नू यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘लव्ह की अरेंज मॅरेज’, ‘हमरे बाराह’ या चित्रपटांमध्ये दिसून आले होते. विनोदी, गंभीर तसेच प्रत्येक प्रकारच्या भूमिका त्यांनी आजवर साकारल्या आहेत. तसेच त्यांचा एक मोठा चाहतावर्ग असून त्यांच्या चित्रपटांनादेखील अधिक प्रसिद्धी मिळते. तसेच आगामी काळातदेखील त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.