अभिनेत्री ईशा कोप्पीकरने दाक्षिणात्य चित्रपटांपासून ते अगदी बॉलिवूडपर्यंत उत्तम काम केले आहे. अभिनेत्रीने अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. अलीकडेच ईशा तिने केलेल्या एका वैयक्तिक खुलास्यामुळे चर्चेत आली आहे. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी अभिनेत्रीला कास्टिंग काउचची शिकार व्हावी लागली असल्याचं समोर आलं आहे. एका ए-लिस्ट अभिनेत्याने तिला एकटे भेटण्यासाठी कसे बोलावले होते याबाबत अभिनेत्रीने सांगितले. (Isha Koppikar Casting Couch)
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत ईशा कोप्पीकर म्हणाली, “तुम्ही काय करु शकता हे तुम्ही नाही तर अभिनेता किंवा कलाकार ठरवू शकतो. तुम्ही #MeToo बद्दल ऐकले आहे आणि जर तुम्ही वजनदार व्यक्ती असता तर तुम्हाला हे खूप कठीण झाले असते. माझ्या काळात अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्री सोडली. एकतर मुलींनी हार मानली. असे खूप कमी लोक आहेत जे अजूनही इंडस्ट्रीत आहेत आणि त्यांनी हार मानली नाही आणि मी त्यापैकी एक आहे”.
ईशा कोप्पीकरने पुढे सांगितले की, वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. अभिनेत्री म्हणाली, “कास्टिंग काउचसाठी एका सेक्रेटरी आणि अभिनेत्याने माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मी १८ वर्षांची होते. त्याने मला सांगितले की काम मिळवण्यासाठी कलाकारांशी मैत्री करावी लागेल. मी खूप मैत्रीपूर्ण आहे, पण मैत्रीचा अर्थ काय? मी इतकी मैत्रीपूर्व आहे आहे की एकदा एकता कपूरने मला काहीशी उद्धट वृत्ती अंगीकारायला सांगितली होती”.
अभिनेत्रीने पुढे खुलासा केला की तिला एकदा ए-लिस्ट अभिनेत्याने एकटे भेटायला बोलावले होते. ईशा म्हणाली, “मी २३ वर्षांची असताना एका अभिनेत्याने मला त्याच्या ड्रायव्हरशिवाय किंवा इतर कोणालाही न घेता एकटीला भेटायला सांगितले. कारण त्याचे इतर अभिनेत्रींबरोबर संबंध असल्याच्या अफवा होत्या. तो म्हणाला की, त्याच्याबद्दल आधीच वाद आहेत आणि कर्मचारी अफवा पसरवतात. पण मी नकार दिला आणि मी एकटी येऊ शकत नाही असे सांगितले. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील ए-लिस्ट अभिनेते होते”.
आणखी वाचा – सायलीसाठी अर्जुनने धरला वटपौर्णिमेचा उपवास, बायकोच्या हातूनच उपवास सोडला अन्…
ईशाने असेही सांगितले की, “अभिनेते आणि दिग्दर्शकांचे मॅनेजर तिला अयोग्यरित्या स्पर्श करायचे. ते फक्त येऊन अयोग्य स्पर्श करणार नाहीत. ते हात दाबतील आणि घाणेरड्या रीतीने म्हणतील की तुला नायकांशी मैत्री करावी लागेल”. ईशा कोप्पीकर शेवटची तामिळ चित्रपट ‘आयलान’ मध्ये दिसली होती. याआधी ती ‘फिजा’, ‘प्यार, इश्क और मोहब्बत’, ‘हॅलो डार्लिंग’ व ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे.